फोटो सौजन्य: iStock
जेव्हा एखाद्या व्यक्तीस नोकरी लागते, तेव्हा सर्वप्रथम त्याचे स्वप्न असते की याच स्वकमाईतून आपण आपली पहिली कार खरेदी करावी. भारतात स्वतःची कार खरेदी करणे हा क्षण एका मोठ्या सणांपेक्षा काही कमी नाही. पण हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात.
खरंतर प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याच्याकडे आपली स्वतःची कार असावी. त्यात त्याने आपल्या कुटुंबाला फिरवून यावे. पण अनेकदा कारची किंमत जास्त असल्याने, हे स्वप्न प्रत्येकाचे पूर्ण होऊ शकत नाही. त्यात आजच्या काळात स्वस्त कार्सची किंमत देखील लाखो रुपयांपासून सुरू होते. आता अशा परिस्थितीत, तुमच्याकडे एक पर्याय आहे तो म्हणजे तुमची ड्रीम कार लोनवर खरेदी करणे.
‘या’ 5 मोठ्या फरकांमुळे Toyota Fortuner Hybrid आणि Regular Fortuner एकसारख्या नाहीत
जर तुम्ही कार लोनवर घेतली तर तुम्हाला वेळेवर EMI भरण्याची समस्या देखील भेडसावते. आता तुमचे काम बजेटमध्ये बसणारी कार खरेदी शोधणे आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांचा पगारही निश्चित असतो. या पगारातून त्यांना मुलांच्या छोट्या छोट्या गरजांपासून सुरुवात करून घरातील सर्व खर्च पूर्ण करावे लागतात. पण जर तुमचा पगार हा 50 हजार असेल तरीही तुम्ही कार खरेदी करू शकता.
जर तुम्ही 50 हजार रुपयांच्या पगारावर चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या बजेटनुसार कोणती कार योग्य आहे, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुमचा पगार दरमहा 50 हजार रुपये असेल, तर तुम्ही अशा कार्स निवडाव्यात ज्यांसाठी तुम्हाला जास्त ईएमआय म्हणजेच हप्ता भरावा लागणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही 6 लाख रुपयांपासून सुरू होणारी कार खरेदी करण्याचा विचार करू शकता.
या कारसाठी तुम्हाला जास्त EMI आणि डाउन पेमेंट द्यावे लागणार नाही. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या बजेटमध्ये कोणत्या चांगल्या कार्स उपलब्ध आहेत का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. या किमतीत तुम्ही टाटा टियागो, मारुती सेलेरियो आणि टाटा पंच सारख्या कार खरेदी करू शकता.
किती पण नवीन कार येऊ द्यात ! ‘या’ 5 SUVs शिवाय ग्राहकांना दुसरे काही दिसतच नाही
उदाहरणार्थ, जर तुम्ही 4.5 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीची कार खरेदी केली आणि तुमचा पगार 30 हजार रुपये असेल, तर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे. यानंतर तुम्ही 3,55,254 रुपयांचे कर्ज घ्यावे. तुम्हाला हे कर्ज 9% व्याजदराने मिळते आणि तेही 7 वर्षांसाठी, म्हणजे तुमचा मासिक हप्ता अर्थातच EMI सुमारे 5,176 रुपये असेल.