फोटो सौजन्य: iStock
भारतात दिवसेंदिवस कार्सची विक्री वाढताना दिसत आहे. यात विविध सेगमेंटमधील कार्सचा समावेश आहे. पण एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांची एक वेगळीच क्रेझ मार्केटमध्ये पाहायला मिळते. फक्त सामान्यांकडेच नाही तर सेलिब्रटी आणि राजकारणी मंडळींकडे दमदार एसयूव्ही पाहायला मिळतात. यावरून समजते की बाजारात सर्वाधिक मागणी एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना आहे.
नुकतेच एप्रिल 2025 मधील वाहनांचा सेल्स रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये कोणत्या एसयूव्ही सर्वात जास्त विकल्या? कोणत्या एसयूव्हींनी टॉप-5 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
वर्षोनुवर्षे अगदी मक्खनसारखी स्मूद धावेल कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ 5 टिप्स
क्रेटा ही दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई एसयूव्ही सेगमेंटमध्ये विकते. दरमहा त्याच्या हजारो युनिट्स विकल्या जातात. गेल्या महिन्यात या एसयूव्हीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये देशभरात त्याच्या 17016 युनिट्सची विक्री झाली.
मारुती सुझुकी एसयूव्ही सेगमेंटमध्ये ब्रेझा देखील विकते. ही एसयूव्ही तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. दरमहा देशभरात त्याचे हजारो युनिट्स विकले जातात. रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 16971 युनिट्स विकल्या गेल्या.
स्कॉर्पिओ ही महिंद्रा मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये विकली जाते. कंपनी ही एसयूव्ही क्लासिक आणि एन सारख्या पर्यायांमध्ये ऑफर करतो. रिपोर्ट्सनुसार, एप्रिल 2025 मध्ये देखील याला खूप पसंती मिळाली आहे. गेल्या महिन्यात देशभरात त्याचे 15534 युनिट्स विकले गेले.
Kia Clavis साठी बुकिंग सुरु? ‘या’ दिवशी भारतात होणार सादर, संभाव्य किंमत असेल…
ग्राहकांच्या आवडत्या एसयूव्हीबद्दल आपण बोलत आहोत आणि टाटा मोटर्सचे नाव येणार नाही. असे होणार नाही. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटाने ऑफर केलेली टाटा नेक्सॉन देखील खूप लोकप्रिय कार आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात देशभरात या एसयूव्हीच्या 15457 युनिट्स विकल्या गेल्या.
मारुती सुझुकी अनेक सेगमेंटमध्ये एसयूव्ही देखील विकते. मारुती फ्रॉन्क्स ही कार सब फॉर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये उत्पादकाकडून उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात, देशभरात या एसयूव्हीच्या 14345 युनिट्स विकल्या गेल्या.