फोटो सौजन्य: @LanesTwisted (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यातही विशेष मागणी ही एसयूव्हींना असते. भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या बेस्ट एसयूव्ही ऑफर करत आहे. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच होत आहे. पण आजही एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक दमदार कार अधिराज्य गाजवत आहे. या कारचे नाव म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर.
अनेक सेलिब्रेटींपासून ते नेतेमंडळींपर्यंतच्या कार कलेक्शनमध्ये फॉर्च्युनर पाहायला मिळते. पण आजही अनेक वाटते की Regular Fortuner आणि Toyota Fortuner Hybrid मध्ये काहीच फरक नाही. हीच बाब लक्षात घेता आज आपण या दोन्ही कारमधील महत्वाचे फरक जाणून घेणार आहोत.
किती पण नवीन कार येऊ द्यात ! ‘या’ 5 SUVs शिवाय ग्राहकांना दुसरे काही दिसतच नाही
टोयोटा फॉर्च्युनर हायब्रिडमधील सर्वात मोठा बदल त्याच्या 2.8-लिटर डिझेल इंजिनमध्ये दिसून येतो, जो आता 48V माइल्ड हायब्रिड सिस्टमसह जोडला गेला आहे. या सेटअपमध्ये ISG (इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर) समाविष्ट आहे, जे कार चालवताना टॉर्क असिस्ट आणि स्मूथ स्टार्ट-स्टॉपचा अनुभव देतो. एकट्या ISG सिस्टीममधून 16bhp पॉवर आणि 42Nm टॉर्क निर्माण होतो, तर एकूण आउटपुट 201bhp/500Nm वर राहते. या बदलामुळे शहरातील वाहतुकीत वाहन चालवणे पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत आणि संतुलित वाटते.
फॉर्च्युनर मधील हायब्रिड सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चांगली इंधन कार्यक्षमता. कंपनीचा दावा आहे की MHEV (माइल्ड हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल) फॉर्च्युनर रेग्युलर डिझेल फॉर्च्युनरपेक्षा 5% जास्त मायलेज देते.
हायब्रिड तंत्रज्ञानामुळे केवळ पॉवर वाढतेच असे नाही तर NVH (Noise, Vibration, Harshness) म्हणजेच वाहनाचा आवाज आणि कंपन देखील कमी होते. इंजिन सुरू-थांबताना आवाज आणि कंपन कमी होते, ज्यामुळे राइडची क्वालिटी चांगली होते. तसेच, हायब्रिड व्हर्जनचे गिअर शिफ्ट डिझेल मॉडेलपेक्षा अधिक स्मूद आहेत. याचा अर्थ असा की ड्रायव्हरला प्रत्येक वेळी गिअर्स बदलताना कमी धक्का बसेल आणि खूप चांगले वाटेल.
वर्षोनुवर्षे अगदी मक्खनसारखी स्मूद धावेल कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ 5 टिप्स
टोयोटा फॉर्च्युनर हायब्रिडची केबिन डिझाइन आणि लेआउट रेग्युलर मॉडेलसारखेच आहे, परंतु त्याचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर विशेषतः हायब्रिडसाठी अपडेट केले गेले आहे. ही बॅटरी चार्ज स्थिती, पॉवर फ्लो आणि रीजनरेशन अलर्ट सारखे ग्राफिक्स प्रदान करते. याशिवाय, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा सारखी स्मार्ट सेफ्टी फीचर्स देखील जोडण्यात आली आहेत. हे नवीन डिस्प्ले केवळ ड्राइव्हला अधिक परस्परसंवादी बनवत नाही तर वाहनाच्या स्थितीचा रिअल-टाइम डेटा देखील दर्शविते.
टोयोटा फॉर्च्युनर हायब्रिडचे वजन त्याच्या बॅटरी पॅक आणि ISG युनिटमुळे रेग्युलर मॉडेलपेक्षा सुमारे 60-80 किलो जास्त आहे. हे व्हर्जन शहरातील रस्त्यांवर अधिक आरामदायी प्रवास घडवून आणते. हायब्रिड असिस्ट अधिक स्टार्टिंग टॉर्क प्रदान करते, ज्यामुळे वाहन हलके आणि ट्रॅफिकमध्ये अधिक उत्तम रित्या चालते.
जर तुम्हाला जास्त मायलेज, सहज प्रवास आणि नवीन तंत्रज्ञान हवे असेल, तर फॉर्च्युनर हायब्रिड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु जर तुमचे प्राधान्य फक्त पॉवर आणि ऑफ-रोडिंग असेल, तर रेग्युलर फॉर्च्युनर अजूनही एक उत्तम एसयूव्ही आहे.