Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

जर तुमचा पगार 40000 असेल आणि तुम्ही एक उत्तम कार शोधत असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. चला काही बेस्ट कार्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 07:05 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक उत्तम कार उपलब्ध
  • 40 हजारच्या पगारात कोणत्या कार आहेत बेस्ट?
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
भारतीय बाजारात SUV खरेदी करणे आता फक्त श्रीमंतांपुरते मर्यादित राहिलेले नाही. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठीही अनेक परवडणारे आणि फीचर-लोडेड पर्याय उपलब्ध आहेत. जर तुमचा मासिक पगार 35 ते 40 हजार रुपये असेल आणि आधीपासून मोठे कर्ज नसेल, तर तुम्हीही एक आकर्षक एसयूव्ही सहज खरेदी करू शकता. चला 6 लाख ते 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत मिळणाऱ्या पाच किफायतशीर, सुरक्षित आणि फीचर्सने सुसज्ज एसयूव्हींची माहिती दिली आहे.

टाटा पंच (Tata Punch)

टाटा पंच ही भारतातील सर्वात किफायतशीर आणि सुरक्षित एसयूव्हींपैकी एक मानली जाते. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपये आहे. यात 1.0 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून CNG पर्यायही उपलब्ध आहे. CNG व्हेरिएंटचे क्लेम्ड मायलेज 26.99 किमी/किलो आहे. फीचर्समध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 10.25 इंच टचस्क्रीन, वायरलेस फोन चार्जर, ड्युअल एअरबॅग आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांचा समावेश आहे.

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा

निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)

निसान मॅग्नाइट कमी किमतीत जास्त फीचर्स देणारी एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.61 लाख रुपये आहे. ही एसयूव्ही 1.0 लिटर नॅचरल एस्पिरेटेड आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल अशा दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. तिचे क्लेम्ड मायलेज 19.9 किमी/लिटर आहे. मल्टी-कलर अँबिएंट लाइटिंग, 7 इंच डिजिटल डिस्प्ले, वायरलेस चार्जर, स्टँडर्ड 6 एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा, VDC, ESC आणि TPMS यांसारखी फीचर्स मिळतात.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (Maruti Suzuki Fronx )

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही आधुनिक डिझाइन आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.84 लाख रुपये आहे. यात 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय दिले आहेत. CNG व्हेरिएंटचे क्लेम्ड मायलेज 28.51 किमी/किलो आहे. 9 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 6 एअरबॅग, ABS, EBD आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स यात मिळतात.

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

स्कोडा कायलॅक (Skoda Kylaq)

स्कोडा कडून नुकतीच लाँच करण्यात आलेली क्यलॅक एसयूव्ही 7.59 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. यात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून क्लेम्ड मायलेज 19.68 किमी/लिटर आहे. 10.1 इंच टचस्क्रीन, 8 इंच डिजिटल क्लस्टर, सिंगल-पॅन सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, 6 एअरबॅग, TPMS आणि 25 हून अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

किया सायरोस (Kia Syros)

किया सायरोस ही भारतीय बाजारातील नवी एसयूव्ही असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.67 लाख रुपये आहे. ती 1.0 लिटर पेट्रोल आणि 1.4 लिटर डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. तिचे क्लेम्ड मायलेज 20.75 किमी/लिटर आहे. 12.3 इंच ड्युअल-स्क्रीन सेटअप, ड्युअल-झोन एसी, 4-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, अँबिएंट लाइटिंग, वायरलेस चार्जर, 6 एअरबॅग, लेव्हल-2 ADAS आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी हाय-टेक फीचर्स यात देण्यात आली आहेत.

Web Title: Best cars for 40 thousand salaried person tata punch nissan magnite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • SUV
  • tata punch

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.