फोटो सौजन्य - Social Media
नवा वर्ष सुरु झालाय मग आयुष्यातही काही तरी नवीन घडवण्याचा विचार करत आहात. आपल्या कुटुंबात नवीन सदस्य म्हणून चारचाकी कार घेऊ इच्छुक आहात. परंतु जास्त बजेट नाही आहे. कमी बजेटमध्ये चांगली परफॉर्मन्स देणारी मोटारगाडी कोणती? जाणून घ्यायची आहे तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखामध्ये काही टर्बो पेट्रोल इंजिन असणाऱ्या प्रसिद्ध आणि स्वस्त कारची माहिती पुरवण्यात आली आहे, जी तुमच्या गरजेची पूर्तता करेल आणि प्रश्नच उत्तर मिळवून देईल. टर्बो इंजिन असणाऱ्या गाड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या गाड्या जरी कमी CC चे असले तरी यामध्ये जास्त शक्ती निर्माण करण्याचे कौशल्य असते. तसेच इंधन बचत होत असल्याने या गाड्या किफायतशीर असतात. इतर गाड्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रदूषण करतात. चला तर मग जाणून घेऊयात, टर्बो इंजिन असणाऱ्या या बेस्ट गाड्यांबद्दल:
मारुती सुजुकी फ्रॉन्क्स
मारुती सुजुकी फ्रॉन्क्स या कारमध्ये 1.0-लिटर इनलाइन थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 100 BHP पॉवर आणि 147 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. मारुती सुजुकी फ्रॉन्क्सचा डेल्टा+ वेरिएंट या इंजिनसह उपलब्ध आहे.
निसान मॅग्नाइट
निसान मॅग्नाइट ही टर्बो पेट्रोल इंजिन असलेली सर्वात स्वस्त कार आहे. यात 1.0-लिटर इनलाइन थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 110 BHP पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. निसान मॅग्नाइटचा टर्बो पेट्रोल इंजिन N-Connecta वेरिएंटपासून उपलब्ध आहे.
रेनो काइगर
टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या कारच्या यादीतील पुढील कार आहे Renault Kiger (रेनो काइगर). रेनो काइगरमध्ये 1.0-लिटर इनलाइन थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 110 BHP पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल तसेच CVT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कंपनी काइगरच्या RXT(O) वेरिएंटपासून टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध करून देते.
सिट्रोएन सी३
ज्या ग्राहकांना टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या हॅचबॅक कारची गरज आहे, त्यांच्यासाठी Citroen C3 (सिट्रोएन सी3) हा चांगला पर्याय आहे. सिट्रोएन सी3 मध्ये 1.2 लिटर इनलाइन थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 110 BHP पॉवर आणि 190 Nm टॉर्क निर्माण करते, तर 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 205 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनी आपल्या शाइन वेरिएंटपासून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करून देते.