फोटो सौजन्य: Social Media
देशात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांसाठी बेस्ट ई कार्स लाँच करत आहे. या कार्सना मार्केटमध्ये ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देत आहे. खरंतर इलेक्ट्रिक कार म्हंटलं की अनेक जणांना टाटाच्या कार्स आठवतात. पण आज आपण एका अशा इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिने मार्केटमध्ये टाटाच्या कार्सना मात दिली आहे.
एमजी मोटर्स भारतात अनेक वर्षांपासून कार्स ऑफर करत आहे. कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील उत्तम कार्स आणत आहे. MG Windsor EV या कारने तर मार्केटमध्ये आपला दबदबा बनवून ठेवला आहे.
कार उत्पादक कंपन्यांसाठी डिसेंबर 2024 कसे होते? जाणून घ्या MG, Mahindra, Hyundai, Kia चे परफॉर्मन्स
MG च्या New Windsor EV ने देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ही कार केवळ 3 महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आली होती, परंतु ती तीन महिने या सेगमेंटमध्ये नंबर-1 कार राहिली आहे. त्याच्या मागणीसमोर टाटा मोटर्सचे Nexon EV, Punch EV आणि Tiago EV सारखे लोकप्रिय मॉडेल्सही मागे राहिले आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विंडसर ईव्हीच्या 10 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. या उत्कृष्ट विक्रीच्या आकड्यावरून हे स्पष्ट होते की ग्राहकांना ही कार खूप आवडली आहे.
JSW MG मोटर इंडियाने दावा केला आहे की विंडसर EV ने सलग तिसऱ्या महिन्यात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहन सेगमेंटमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. गेल्या महिन्यात कारची विक्री 3,785 युनिट्स होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये 3,116 तर नोव्हेंबरमध्ये 3,144 कार्सची विक्री झाली होती. म्हणजेच या तीन महिन्यांत एकूण 10,045 युनिट्सची विक्री झाली आहे.
एमजी विंडसर EV ने या कारची एक्स-शोरूम किंमत 13.50 लाख ते 15.50 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते. तसेच टाटा कर्व ईव्ही, महिंद्रा XUV400 ला त्याच्या सेगमेंटमध्ये मागे टाकले.
अखेर जानेवारी 2025 मध्ये Hyundai Creta EV होणार लाँच, सोशल मीडियावर पहिला टिझर प्रदर्शित
कंपनीने Windsor EV ला तीन व्हेरियंट बेस (Excite), मिड (Exclusive) आणि टॉप (Essence) या तीन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. यापैकी एक्साइटला 15%, एक्सक्लुझिव्ह 60% आणि एसेन्सला 25% मागणी आहे. त्याचबरोबर कंपनीने या कारसोबत बॅटरी सबस्क्रिप्शन प्लान देखील सादर केला आहे. अशा परिस्थितीत, फक्त 10% लोकांनी ही कार बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनसह बुक केली आहे. तर, 90% लोकांनी ही कार बॅटरीसह बुक केली आहे.
MG Windsor EV ला 38kWh बॅटरी पॅक मिळत आहे. या कारची रेंज 331 किमी आहे. या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 134bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे चार ड्राइव्ह मोड आहेत.