(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर भगवान शिव यांना समर्पित वाळूवर एक सुंदर आकृती तयार केली. ही खास कलाकृती २०२६ च्या महाशिवरात्रीनिमित्त तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कलाकाराने १७,००० पवित्र रुद्राक्ष आणि ५०० लहान शिवलिंगांचा वापर करुन या आकृतीला तयार केले. वाळूत तयार करण्यात आलेली ही सुंदर आकृती पाहून यूजर्स भारावून गेले आहेत. महादेवावरील श्रद्धा आणि कलेचा संगम दाखवणारी ही अद्भुत कलाकृती पाहून युजर्स “हर हर महादेव” चा जयघोष करत आहेत. हा व्हिडिओ दाखवून देतो की, कला आणि श्रद्धेचा संगम एक अद्भूत कलाकृतीला जन्म देतो.
On the auspicious occasion of #MahaShivaratri, my sand art installation at Puri Beach, crafted with 17,000 sacred Rudraksha beads and 500 miniature Shiva Lingas, spreads the divine message “Har Har Mahadev.” 🔱✨ #HarHarMahadevॐ pic.twitter.com/hR4C2WgLen — Sudarsan Pattnaik (@sudarsansand) February 15, 2026
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @sudarsansand नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पुरी बीचवर माझी वाळू कलाकृती, १७,००० पवित्र रुद्राक्ष मणी आणि ५०० लघु शिवलिंगांनी बनवलेली, “हर हर महादेव” हा दिव्य संदेश पसरवते’. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ॐ नमः शिवाय… हर हर महादेव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओम नमो पार्वती वधाये हर हर महादेव महाराज की जय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप सुंदर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






