जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद
भारतीय खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात मिळणाऱ्या पदार्थांची चव चाखण्यासाठी देश विदेशातून पर्यटक भारतात येतात. भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यात भारतात फेमस असलेले चटणीचे अनेक वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते. यापूर्वी तुम्ही खोबऱ्याची चटणी, टोमॅटो चटणी, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला आंबटगोड चवीची कवठ चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात कवठ पाहायला मिळते. वर्षातील अगदी दोन ते तीन महिनेच कवठ मिळते. त्यामुळे वरून कडक दिसणारे पण आतून अतिशय मऊ आणि गोड असलेले फळ सगळेच आवडीने खातात. पूर्वी कवठ हे हातगाड्यांवर सुद्धा विकले जायचे. कवठाच्या आतील गर काढून त्यात मसाला आणि मीठ मिक्स करून खाण्यास दिले जायचे. या फळाची चव एकदा खाल्ल्यानंतर कायमच जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे कवठाची चटणी नक्की बनवून पहा. ही चटणी तुम्ही गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कवठ चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’






