Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगदी घाणेरड्यातील घाणेरडा हेल्मेट सुद्धा दिसेल एकदम चकाचक, ‘या’ आहेत सोप्या Helmet Cleaning Tips

जर तुमचेही हेल्मेट घाण दिसत असेल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचे कारण म्हणजे आज आपण काही बेस्ट हेल्मेट क्लिनिंग टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 20, 2025 | 05:32 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • बाईक चालवतना हेल्मेट महत्वाचे
  • मात्र, खराब आणि घाणेरड्या हेल्मेटने रायडींग अनुभव खराब होऊ शकतो
  • तुम्ही तुमचे हेल्मेट स्वच्छ कसे ठेऊ शकतात? त्याबद्दल जाणून घेऊयात
जशी बाईक स्वच्छ आणि टापटीप हवी, तसेच हेल्मेटही स्वच्छ असते. बरेच लोकं हेल्मेट स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या स्वच्छ हेल्मेटमुळे आपली राईड अजूनच चांगली होऊ शकते. मात्र, अनेक जणांचे हेल्मेट दिसायला थोडे बुरसट दिसतात. म्हणूनच आज आपण हेल्मेट स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊयात.

हेल्मेटच्या बाहेरील भागाची सफाई

सुरुवातीला पाण्यात हलके भिजवलेले मायक्रोफायबर कापड घ्या आणि हेल्मेटची बाहेरची बाजू हलकेच पुसा. यामुळे त्यावर जमा झालेली धूळ सहज निघून जाते. जर काही हट्टी डाग असतील, तर त्या जागेवर ओलसर टिश्यू पेपर 15–20 मिनिटांसाठी ठेवून द्या. नंतर डाग सहज निघतील. आवश्यकता भासल्यास ही प्रक्रिया पुन्हा करा. शेवटी कोरड्या मायक्रोफायबर कापडाने संपूर्ण बाहेरचा भाग स्वच्छ पुसून घ्या.

KTM च्या ‘या’ बाईकमध्ये आढळल्या खराबी! फटाफट परत बोलावली वाहनं

हेल्मेटच्या एअर व्हेंट्सची सफाई

हेल्मेट दीर्घकाळ वापरल्याने एअर व्हेंट्समध्ये खूप धूळ जमा होते. व्हेंट्स मोठे असतील, तर कापडाच्या कोपऱ्याने स्वच्छ करा. व्हेंट्स लहान असतील, तर रोल केलेला पातळ टिश्यू पेपर किंवा इअरबड वापरा. सफाई करताना खूप जोर लावू नका, कारण व्हेंट बंद करण्याचा मेकॅनिझम तुटण्याची शक्यता असते.

हेल्मेटच्या इनर पॅड्सची सफाई

हेल्मेटमध्ये सर्वात जास्त घाण इनर कुशनमध्ये साचते. सफाई करण्यापूर्वी हेल्मेटची मॅन्युअल पाहा आणि पॅड्स कसे काढायचे ते जाणून घ्या. पॅड्स काढल्यानंतर तुम्ही त्यांना ओलसर कापडाने पुसून साफ करू शकता किंवा हलक्या साबणाच्या पाण्यात जवळपास 1 तास भिजवून ठेवू शकता. साबणाच्या पाण्यात धुतल्यास, नंतर स्वच्छ पाण्याने हलके धुऊन हाताने दाबून पाणी काढा व कधीही पॅड्स पिळू नका. त्यांना सावलीत वाळवा; हेअर ड्रायरचा वापर करू नका, कारण  त्यामुळे पॅड्स खराब होऊ शकतात. काही पॅड्समध्ये रिमूव्हेबल लाइनर असतात आणि ते वॉशिंग मशीनच्या जेंटल किंवा सॉफ्ट मोडवरही धुतले जाऊ शकतात.

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

हेल्मेटच्या वायझरची सफाई

वायझर स्वच्छ करण्यासाठी गुनगुने पाणी वापरा. हट्टी डाग असतील तर त्या जागेवर ओलसर टिश्यू पेपर लावून काही वेळ ठेवा. हेल्मेटचा बाहेरील भाग साफ करण्यासाठी वापरलेलाच उपाय आहे. नंतर मायक्रोफायबर कापडाने हलके पुसून वायझर कोरडे करा, जेणेकरून स्क्रॅच येणार नाहीत.

वायझर मेकॅनिझमची सफाई

हेल्मेट बराच काळ न साफ केल्यास वायझर मेकॅनिझममध्ये धूळ-माती साचते. त्यासाठी ओलसर कापड वापरून सफाई करा. छोट्या कपारी किंवा कोपऱ्यांसाठी टिश्यू पेपर किंवा इअरबड वापरा. तुमच्या हेल्मेटमध्ये रिमूव्हेबल मेकॅनिझम असल्यास, ते पाण्याने धुऊन वाळवू शकता.

Web Title: Best easy helmet cleaning tips which will shine helmet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike
  • Helmet

संबंधित बातम्या

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या
1

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?
2

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा
3

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
4

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.