फोटो सौजन्य: Gemini
दुचाकी उत्पादक कंपनी केटीएम भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांच्या दमदार बाईक ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने ऑफर केलेल्या चार बाईक्समध्ये दोष आढळून आले आहेत. त्यानंतर, जागतिक स्तरावर रिकॉल जारी करण्यात आला आहे. कोणत्या केटीएम बाईक्समध्ये दोष आढळले आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केटीएमने चार बाईकसाठी जागतिक स्तरावर रिकॉल जारी केले आहे. या मोटारसायकली Duke रेंजमध्ये ऑफर केल्या आहेत.
वृत्तांनुसार, ज्या बाईकसाठी रिकॉल जारी करण्यात आला आहे त्यांच्या इंधन टाकीच्या कॅप सीलमध्ये दोष आहेत. दोषपूर्ण सील कालांतराने क्रॅक होऊ शकतो, ज्यामुळे टाकीच्या कॅपजवळ इंधन गळतीचा धोका वाढतो.
कंपनीकडून ज्या बाईकसाठी रीकॉल जारी करण्यात आला आहे, त्यात KTM Duke 125, 250 Duke, 390 Duke आणि 990 Duke या मॉडेल्सचा समावेश आहे. मात्र, नेमक्या किती युनिट्सवर हा रीकॉल लागू आहे, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. एवढं मात्र स्पष्ट करण्यात आलं आहे की या बाईक 2024 दरम्यान उत्पादनात आल्या होत्या.
Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या
KTM कंपनीकडून या मॉडेल्सचे मालक असलेल्या सर्वांना ई-मेल, फोन किंवा मेसेजद्वारे रीकॉलची माहिती पाठवली जात आहे. यानंतर ग्राहकांना त्यांच्या जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोटरसायकल घेऊन जाणे आवश्यक आहे. तिथे प्रभावित युनिट्सची तपासणी केली जाईल आणि ज्यामध्ये दोष आढळेल त्यांची दुरुस्ती कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता करण्यात येईल.
Ans: KTM ने Duke रेंजमधील चार मॉडेल्स — KTM Duke 125, 250 Duke, 390 Duke आणि 990 Duke — यांच्यासाठी रीकॉल जारी केला आहे. या सर्व बाईक्समध्ये इंधन टाकीच्या कॅप सीलमध्ये दोष आढळला आहे.
Ans: कंपनी प्रभावित मॉडेल्सच्या मालकांना ई-मेल, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे थेट संपर्क साधून रीकॉलची माहिती देत आहे. सूचना मिळाल्यानंतर ग्राहकांनी जवळच्या सर्व्हिस सेंटरला भेट देणे आवश्यक आहे.
Ans: प्रभावित युनिट्स सर्व्हिस सेंटरमध्ये तपासल्या जातील आणि ज्यामध्ये दोष आढळेल त्यांची दुरुस्ती पूर्णपणे मोफत करण्यात येईल. कोणतेही अतिरिक्त शुल्क ग्राहकाला आकारले जाणार नाही.






