Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भन्नाट फीचर्समुळेच तर MG Windsor EV Pro इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी ठरते

नुकतेच एमजीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार MG Windsor EV Pro लाँच केली आहे. यात कंपनीने अनेक दमदार फीचर्स दिले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: May 07, 2025 | 06:15 PM
फोटो सौजन्य: @automobilindia8 (X.com)

फोटो सौजन्य: @automobilindia8 (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भारतीय ऑटो बाजारात झपाट्याने वाढताना दिसत आहे. ग्राहक देखील मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या नव्या इलेक्ट्रिक कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. यातच आता मार्केटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. MG Windsor EV चे अपडेटेड व्हर्जन म्हणून MG Windsor EV Pro लाँच झाली आहे.

जर तुम्ही अशा इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल ज्यामध्ये पॉवरफुल बॅटरी, लॉंग ड्रायव्हिंग रेंज आणि प्रगत तंत्रज्ञान असेल, तर एमजी विंडसर ईव्ही प्रो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. चला या कारच्या कारमधील काही बेस्ट फीचर्स जाणून घेऊयात.

मार्केटमध्ये नुकतेच लाँच झालेल्या MG Motor Pro EV साठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?

मोठी बॅटरी

भारतात पहिल्यांदाच, एमजी विंडसर ईव्ही प्रो मध्ये 52.9kWh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. ही बॅटरी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय मॉडेल्सपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. याचा अर्थ असा की आता ही कार जास्त अंतर कापण्यास अधिक सक्षम झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ती पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची चिंता करावी लागणार नाही.

449 किमीची लॉंग रेंज

या मोठ्या बॅटरीमुळे, एमजी विंडसर ईव्ही प्रो आता एकदा चार्ज केल्यावर 449 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्याची रेंज पूर्वीच्या तुलनेत 117 किलोमीटरने वाढली आहे. लांब प्रवास आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी हा एक चांगला पर्याय बनला आहे.

60 मिनिटांत 80% चार्ज

आता तुम्हाला चार्जिंगसाठी तासंतास वाट पाहावी लागणार नाही. यामध्ये देण्यात आलेल्या 60 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे, ही कार फक्त 1 तासात 20% ते 80% पर्यंत चार्ज होते. जुन्या मॉडेलमध्ये 45 किलोवॅट चार्जिंग होते, जे यापेक्षा खूपच हळू होते.

अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती

ADAS फिचर

एमजी विंडसर ईव्ही प्रो मध्ये आता अधिक प्रगत एडीएएस (Advanced Driver Assistance Systems) फीचर्स आहेत, जे तुमचे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बनवतात. यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे, जे ट्रॅफिकनुसार कारचा स्पीड आपोआप अ‍ॅडजस्ट करते, ज्यामुळे वारंवार ब्रेक लावण्याची आणि वेग वाढवण्याची गरज दूर होते. लेन कीप असिस्ट कारला योग्य लेनमध्ये ठेवते, ज्यामुळे महामार्गांवर कार चालवणे अधिक सोपे होते.

पॉवर्ड टेलगेट, लक्झरी कारसारखे फिचर

एमजीने आता या कारमध्ये पॉवर्ड टेलगेटची सुविधा देखील जोडली आहे. याचा अर्थ तुम्ही आता फक्त एक बटण दाबून बूट उघडू किंवा बंद करू शकता. हे फिचर विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे नियमितपणे सामान लोड किंवा अनलोड करतात.

V2L आणि V2V टेक्नॉलजी

एमजी विंडसर ईव्ही प्रो आता V2L (Vehicle to Load) आणि V2V (Vehicle to Vehicle) तंत्रज्ञानासह येते, ज्यामुळे ती केवळ कार नाही तर एक पॉवर स्टेशन बनते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारच्या बॅटरीमधून थेट मोबाईल डिव्हाइस, घरगुती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि इतर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकता.

Web Title: Best features of mg windsor ev pro which made this electric car unique

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Marathi News

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
2

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
3

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
4

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.