फोटो सौजन्य: @volklub (X.com)
ज्याप्रमाणे भारतात महागाई वाढताना दिसत आहे, त्याचप्रमाणे कार्सची किंमत देखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिश्याला अधिकची कात्री बसत आहे. पण असे जरी असले तरी जपानी वाहन निर्माता कंपनी होंडाने आपल्या एका कारच्या किमतीत कपात केली आहे.
एकीकडे ऑटोमोबाईल उत्पादक त्यांच्या कारच्या किमती सतत वाढवत असताना, दुसरीकडे होंडाने त्यांच्या एसयूव्हीच्या किमती कमी केल्या आहेत. होंडा कारच्या वेबसाइटनुसार, Honda Elevate ची किंमत किती कमी करण्यात आली आहे? कोणता व्हेरियंट खरेदी करणे स्वस्त झाले आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Royal Enfield ने अचानक ‘या’ बाईकची थांबवली सेल्स आणि बुकिंग, जाणून घ्या कारण
होंडाने एलिव्हेट एसयूव्हीची किंमत कंपनीने कमी केली आहे. ही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देखील दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Honda Elevate Apex Edition ची किंमत काही काळासाठी कमी करण्यात आली आहे.
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, होंडा एलिव्हेट एपेक्स एडिशनची किंमत 32 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या एडिशनची पूर्वीची किंमत 12.71 लाख रुपये होती, जी आता 12.39 लाख रुपये करण्यात आली आहे.
होंडाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या व्ही मॅन्युअल व्हेरियंटमध्ये किंमत कमी करण्यात आली आहे. हे व्हेरियंट अॅपेक्स एडिशनसह कमी किमतीत खरेदी करता येईल.
सप्टेंबर 2024 मध्ये होंडाने अॅपेक्स एडिशन सादर केले होते. हे एडिशन फक्त एसयूव्हीच्या V आणि VX व्हेरियंटमध्ये दिले जात आहे.
एसयूव्हीमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या एक्सटिरिअरला सिल्व्हर अॅक्सेंटसह स्पॉयलरखाली पियानो ब्लॅक फ्रंट देण्यात आला आहे. तसेच, स्पॉयलरखाली पियानो ब्लॅक साइड, क्रोम इन्सर्टसह पियानो ब्लॅक रियर लोअर गार्निश, अॅपेक्स एडिशन बॅज आणि टेलगेटवर एम्ब्लेम आहे.
कमालच आहे ! ‘या’ व्यक्तीने ‘ही’ EV 5.8 लाख किलोमीटर चालवत केली 18.2 लाख रुपयांची बचत
या कारच्या इंटिरिअरमध्ये ड्युअल-टोन आयव्हरी आणि ब्लॅक थीम आहे ज्यामध्ये दरवाजाच्या लायनिंगवर लेदरेट, आयपी पॅनल्सवर लेदरेट आणि अपहोल्स्टर्ड सीट कव्हर्स आहेत. या एडिशनमध्ये सात रंगांच्या ऑप्शन्ससह अँबीयंट लाइट दिला आहे.
एलिव्हेट एसयूव्ही ही कंपनीने मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. या सेगमेंटमध्ये, Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, आणि Kia Seltos सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.