(फोटो सौजन्य-AI एआय)
178 km रेंज आणि दमदार बॅटरी
C12 MaxR मध्ये 3.8 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार पूर्ण चार्जमध्ये स्कूटर 178 km पर्यंत धावू शकते. ही बॅटरी 4.2 kW PMSM मोटरला ऊर्जा देते. रायडिंगसाठी Eco, Ride आणि Sport असे 3 मोड मिळतात. बॅटरी सुमारे 3 तास 50 मिनिटांत 80% आणि जवळपास 5 तास 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.
रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी
38 लिटर स्टोरेजची मोठी जागा
दैनंदिन वापरासाठी C12 MaxR चे 38 लिटर अंडरसीट स्टोरेज विशेष फायदेशीर ठरते. यात 2 हेल्मेट ठेवण्याइतकी जागा मिळते. याशिवाय फ्लॅट फ्लोअरबोर्ड, बॉटल होल्डर्स, अंब्रेला होल्डर आणि लॉक करण्यायोग्य ग्लोव्हबॉक्स देण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबासाठी खरेदी, ऑफिस किंवा रोजच्या प्रवासात जास्त सामानाची अडचण कमी होते.
5 इंच TFT आणि स्मार्ट फीचर्स
स्कूटरमध्ये 5 इंच TFT डिस्प्ले असून त्यावर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, Distance-to-Empty आणि कस्टमायझेबल थीम्स पाहता येतात. Bluetooth कनेक्टिव्हिटी आणि वायरलेस चार्जिंगही मिळते. Fall Sense, अँटी-थेफ्ट टेक्नॉलॉजी आणि स्टँडवर मोटर कट-ऑफ यांसारख्या सुरक्षा सुविधा देण्यात आल्या आहेत.
Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
प्रीमियम लूक आणि आरामदायी सस्पेंशन
फुल-LED लाइटिंग आणि अलॉय व्हील्समुळे स्कूटरला आधुनिक लूक मिळतो. पुढे हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेंशन, तर मागे 5-स्टेप अॅडजस्टेबल Nitrox गॅस-चार्ज्ड सस्पेंशन आहे. त्यामुळे खराब रस्ते आणि वेगवेगळ्या वजनाच्या वापरात आराम ठेवण्यास मदत होते.
ब्रेकिंग आणि ग्राउंड क्लीयरन्स
C12 MaxR मध्ये दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, 12-इंच ट्युबलेस टायर्स आणि 160 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळते. त्यामुळे शहरातील खड्डे, स्पीड ब्रेकर आणि विविध रस्त्यांवर स्कूटर हाताळणे सोपे होऊ शकते. एकूणच, रेंज, मोठे स्टोरेज, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि आरामदायी सेटअप यामुळे C12 MaxR ची ₹1.46 लाख किंमत काही ग्राहकांसाठी योग्य ठरू शकते.






