Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता परदेशातही चालवा स्वतः गाडी! भारतीय परवान्यासोबत ‘या’ गोष्टी असतील तर काम होईल सोपं…

बहुतेक देशांमध्ये फक्त भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स (DL) पुरेसा नसतो. काही देश अल्पकालीन वास्तव्यासाठी तो मान्य करतात, पण अनेक ठिकाणी कायदेशीररित्या गाडी चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना (IDP) आवश्यक असतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 02:34 PM
International Driving Permit

International Driving Permit

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय परवान्यासह तुम्ही परदेशात गाडी चालवू शकता का?
  • आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना म्हणजे काय?
  • IDP साठी अर्ज कसा करावा?
International Driving Permit : जर तुम्ही परदेश प्रवासाचे नियोजन करत असाल आणि तिथे स्वतः गाडी चालवण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकांना असे वाटते की केवळ भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सोबत असल्यास परदेशात गाडी चालवता येते, पण प्रत्यक्षात तसे नाही. बहुतेक देशांमध्ये कायदेशीररित्या गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना (International Driving Permit – IDP) असणे आवश्यक आहे.

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना (IDP) म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना हा एक अधिकृत दस्ताऐवज आहे. जो भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आवृत्ती आहे. ही आवृत्ती संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाअंतर्गत अधिकृत आहे आणि तुम्ही भारतात वैध परवानाधारक ड्रायव्हर आहात हे सिद्ध करते. IDP मध्ये तुमचा फोटो, वैयक्तिक माहिती आणि तुम्ही जे वाहन चालवणार आहात त्या वाहन श्रेणीचे तपशील नोंद केलेले असताता. ही माहिती बऱ्याच भाषांमध्ये अनुवादीत करत येते ज्यामुळे परदेशी अधिकाऱ्यांना तुमची ओळख आणि परवाना समजणं सोपं होतं. IDP सध्या 150 हून अधिक देशांमध्ये वैध आहे. हा परवाना सामान्यतः जारी केलेल्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध असतो आणि तो नेहमी तुमच्या पासपोर्ट आणि भारतीय परवान्यासोबत तुमच्याकडे नेहमी असणं आवश्यक आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर अनेक देशांमध्ये कार भाड्याने घेणे आणि कार चालवणेही कठीण होऊ शकते.

IDP साठी अर्ज कसा करावा?

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे. तुम्ही भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘परिवहन’ (Parivahan) पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची प्रक्रिया: १. वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम अधिकृत परिवहन पोर्टलवर जा. २. फॉर्म ४-ए (Form 4A) भरा: ऑनलाइन अर्जामध्ये ‘Form 4A’ निवडा आणि आवश्यक माहिती भरा. ३. कागदपत्रे अपलोड करा:  वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत, पासपोर्टची प्रत, वैध व्हिसा (Visa) ची प्रत, अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो. काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्राची (Medical Certificate) गरज भासू शकते. तुम्ही UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे अर्जाचे शुल्क भरू शकता. काही वेळा आधार पडताळणीसाठी स्थानिक आरटीओमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

अर्ज यशस्वीरित्या सबमिट आणि पडताळणी झाल्यानंतर, साधारण ३ ते ७ कार्यदिवसांत तुमचा IDP परवाना तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवला जातो.

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Web Title: Can drive abroad with an indian licence check key documents you need to know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • automobile news
  • driving license
  • Driving Rules
  • Travel

संबंधित बातम्या

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?
1

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?
2

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच
3

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?
4

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.