Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day

Classic Legends : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभरातील २,००० पेक्षा जास्त जावा, येझदी आणि BSA रायडर्सनी 'नोमॅड्स' या सामायिक ओळखीअंतर्गत भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले. १५० पेक्षा जास्त डीलरशिप्सच्या माध्यमातून विविध वयोगटांतील रायडर्स एकत्र आले. त्यांनी मोटरसायकल चालवण्यामागील स्वातंत्र्याची भावना साजरी केला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 17, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम!
  • जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally
  • अनोख्या पद्धतीने साजरा केला Independence Day
Classic Legends : संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जावा, येझदी आणि BSA रायडर्सनी नोमॅड्सच्या अंतर्गत देशभर बाईक रॅलीमध्ये भाग घेतला. या उपक्रमातून मोटरसायकल चालवण्यामागील स्वातंत्र्याची भावना साजरी करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ( Classic Legends ) 

किया इंडियाचा डीलर ट्रेनिंग नेटवर्क विस्तार; अहमदाबादमध्ये नवीन अकॅडमी सुरू

2,000 पेक्षा जास्त रायडर्स एकत्र

स्वातंत्र्यदिनाच्या या बाईक रॅलीत 150 डीलरशिपच्या माध्यमातून 2,000 पेक्षा जास्त रायडर्स एकत्र आले. यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, वयोगटांचे आणि विविध पद्धतीने बाईक चालवणारे रायडर्स सामील झाले होते. या उपक्रमातून जावा, येझदी आणि BSA कम्युनिटीमधील रायडर्सना जोडणारा बंधुभाव आणि बाईक चालवण्याची समान आवड दिसून आली.

नोमॅड्स नेमकं काय आहे?

नोमॅड्स ही जावा, येझदी आणि BSA रायडर्सची एक सामायिक ओळख आहे, जी ब्रँड, भाग आणि पिढ्यांच्या पलीकडे जोडणारी आहे. ही ओळख रायडर्सनीच तयार केली असून त्यांच्या एकत्रित अनुभवांनी घडवली आहे. ती आपल्या समविचारी समूहासोबत बाईक चालवण्याचा आनंद आणि त्यातील सर्वसमावेशकता दाखवून देते.

सशस्त्र दलांसोबत शौर्य विजय यात्रेसाठी भागीदारी

नुकतीच क्लासिक लिजेंड्सने भारतीय सैनिकांचे शौर्य, सेवा आणि आत्मसमर्पणाला आदरांजली वाहण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांसोबत शौर्य विजय यात्रेसाठी भागीदारी केली होती. स्वातंत्र्यदिनाच्या या बाईक रॅलीने त्याच राष्ट्रीय अभिमानाची भावना पुन्हा निर्माण केली आणि रायडर्सना देश आणि मोटरसायकल चालवणे या दोन्हीची ओळख असणारे स्वातंत्र्य साजरे करण्याची संधी दिली.

हाच मोटरसायकल चालवण्याचा खरा गाभा

क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “माझा स्वतःचा रस्ता निवडण्याचे स्वातंत्र्य आणि हा प्रवास इतरांसोबत शेअर करण्याचा आनंद हाच मोटरसायकल चालवण्याचा खरा गाभा आहे. स्वातंत्र्यदिन हा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मूल्यांची आणि त्याचे रक्षण करणाऱ्या त्यागाची आठवण करून देतो. अगदी गेल्याच महिन्यात, कारगिल विजय दिनानिमित्त, आम्हाला आमच्या सैनिकांचे शौर्य, सेवा आणि आत्मसमर्पणाचा सन्मान करण्याची संधी मिळाली. आज नोमॅड्सच्या माध्यमातून विविध भागातील आणि पिढ्यांतील रायडर्स एकत्र आले आणि त्यांनी आपल्या सशस्त्र दलांमध्ये असलेली तीच स्वातंत्र्याची भावना साजरी केली.”

नोमॅड्स कम्युनिटी जशी विस्तारत आहे, तसे यांसारखे उपक्रम आणि बाईक रॅली देशभरातील जावा, येझदी आणि BSA रायडर्समधील नाते अधिक घट्ट करतील. तसेच बाईक चालवण्याच्या समान आवडीतून त्यांच्यातील संबंध आणखी मजबूत करतील.

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

Web Title: Classic legends over 2000 jawa yezdi bsa riders celebrate 80th independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • automobile
  • Independence Day
  • Marathi News
  • Royal Enfield classic 350

संबंधित बातम्या

रंगभूमीवर उलगडणार एका गावाची हृदयस्पर्शी कथा! ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’मध्ये प्रेम, कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा  संगम
1

रंगभूमीवर उलगडणार एका गावाची हृदयस्पर्शी कथा! ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’मध्ये प्रेम, कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा संगम

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी
2

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने शेअर केला ‘तो’ खास फोटो!  पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष
3

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने शेअर केला ‘तो’ खास फोटो! पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
4

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.