Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनधारकांनो लक्ष द्या! महामार्गांवर FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड! केंद्र सरकारचा नवा नियम

जर एखादे वाहन टोल न भरता नाक्यावरून पुढे गेले किंवा तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट पूर्ण झाले नाही, तर संबंधित वाहन मालकाला थेट डिजिटल नोटीस पाठवली जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 09:52 PM
सरकारने अखेर घोषणा केलीच ! 'या' वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

सरकारने अखेर घोषणा केलीच ! 'या' वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

Follow Us
Follow Us:

  • वाहनधारकांनो लक्ष द्या!
  • महामार्गांवर FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड!
  • केंद्र सरकारचा नवा नियम
Highway Toll New Rule India: देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून (National Highways) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने (Central Goverment) टोल वसुलीचे नियम अधिक कडक केले आहेत. ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2026’ मध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या असून, 17 मार्च 2026 पासून हे नवे नियम देशभरात लागू झाले आहेत. या नव्या नियमांमुळे आता टोल चुकवणे किंवा तांत्रिक कारणास्तव पेमेंट प्रलंबित ठेवणे वाहनधारकांना महागात पडणार आहे.

काय आहे नवीन ‘ई-नोटीस’ प्रणाली?

केंद्र सरकारने आता ‘ई-नोटीस’ (E-Notice) सिस्टीम कार्यान्वित केली आहे. जर एखादे वाहन टोल न भरता नाक्यावरून पुढे गेले किंवा तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट पूर्ण झाले नाही, तर संबंधित वाहन मालकाला थेट डिजिटल नोटीस पाठवली जाईल. या नोटिसीमध्ये वाहनाचा तपशील, प्रवासाची वेळ आणि थकीत रकमेची संपूर्ण माहिती असेल. ही नोटीस एसएमएस (SMS), ईमेल किंवा अधिकृत मोबाईल ॲपद्वारे पाठवली जाणार आहे.

‘अनपेड युजर फी’ आणि 72 तासांची मुदत

नव्या नियमावलीत ‘अनपेड युजर फी’ (Unpaid User Fee) हा नवीन शब्द जोडण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, टोल व्यवहार इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये नोंदवला गेला आहे, परंतु त्याचे पेमेंट यशस्वी झालेले नाही. फास्टॅगमध्ये (FASTag) कमी शिल्लक असणे, ट्रान्झॅक्शन फेल होणे किंवा तांत्रिक चुकीमुळे पैसे कापले न जाणे अशा प्रकरणांचा यात समावेश होतो. वाहनधारकांना ही थकीत रक्कम भरण्यासाठी 72  तासांचा अवधी दिला जाईल. जर नोटीस मिळाल्यापासून 72 तासांच्या आत मूळ टोल रक्कम भरली, तर कोणताही अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही. मात्र, 72 तासांची मुदत ओलांडल्यास, वाहनधारकाला दुप्पट टोल रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.

आई शपथ! आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार? सरकार 1 GB डेटावर ‘इतका’ टॅक्स लावण्याच्या तयारीत

15 दिवसांनंतर ‘वाहन’ पोर्टलवर होणार नोंद

जर एखाद्या वाहनधारकाने १५ दिवसांपर्यंत थकीत टोल भरला नाही आणि त्याविरोधात कोणतीही तक्रार नोंदवली नसेल, तर ही थकबाकी थेट सरकारच्या ‘वाहन’ (VAHAN) डेटाबेसमध्ये नोंदवली जाईल. एकदा का ही नोंद झाली की, त्या वाहनाशी संबंधित सरकारी सेवांवर (उदा. फिटनेस सर्टिफिकेट, आरसी रिन्यूअल इ.) तात्पुरती बंदी येऊ शकते. जोपर्यंत थकीत दंड भरला जात नाही, तोपर्यंत या सेवा पूर्ववत केल्या जाणार नाहीत.

तक्रार निवारण सुविधा

वाहनधारकांच्या सोयीसाठी तक्रार करण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. जर एखाद्या चालकाला आपल्याला आलेली ई-नोटीस चुकीची वाटत असेल, तर तो ७२ तासांच्या आत ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. विशेष म्हणजे, प्रशासनाला या तक्रारीचा निपटारा 5 दिवसांच्या आत करावा लागेल. जर दिलेल्या मुदतीत निर्णय झाला नाही, तर ती नोटीस रद्द मानली जाईल.

पारदर्शकतेवर सरकारचा भर

टोल वसुली प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे आणि महसुली गळती रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात सरकार ‘बॅरियर-फ्री’ (फाटके विरहित) आणि ‘जीपीएस आधारित टोल’ प्रणालीकडे वाटचाल करत आहे. त्या पार्श्वभूमीवर, ही ई-नोटीस यंत्रणा डिजिटल टोल वसुलीला अधिक सक्षम बनवण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव दुर्दैवी! ‘सदन म्हणजे जत्रा नाही, नियमानेच….’; अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Web Title: Double fine now applicable if fastag is not scanned on highways new rule by the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • Central Governement
  • FASTag
  • National Highways

संबंधित बातम्या

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
1

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.