Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त यादीत आता सर्व 8 तालुक्यांचा समावेश झाला आहे. शासनाच्या निर्णयामुळे कोणत्या सवलती मिळू शकतात आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 15, 2026 | 05:59 PM
Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यासह सर्व 8 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • महसूल सवलत, पीककर्ज पुनर्गठन आणि कृषीपंपांच्या वीजबिलात सूट यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
  • पीक नुकसानीचे पंचनामे आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात राज्यातील ३०५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा यापूर्वीच दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला होता. आता गोंदिया, आमगाव, देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव या उर्वरित सात तालुक्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पसरले आहे. आता शेतकऱ्यांच्या मदतीची प्रतिक्षा करावी आहे.

खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्याची तूट आणि पावसातील खंडामुळे सुरवातीला जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यात आला होता. अन्य सात तालुके यातून वगळण्यात आले होते. मात्र १४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयान्वये उर्वरित सातही तालुक्यांचा (गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनीचा दुष्काळग्रस्त यादीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ८ तालुके ट्रीगर-१ व ट्रीगर-२ मध्ये समाविष्ट झाले आहेत. सुरवातीला राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‘ट्रीगर-१ (प्रथम कळ)’ लागू करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश होता.

आता गोंदिया, आमगाव, देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव या उर्वरित सात तालुक्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

शासन निर्णयानुसार, प्रभावित भागांमध्ये महसूल वसुलीत सवलत, पीककर्ज वसुलीत सवलत, कृषीपंपांच्या वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची उपलब्धता तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण प्रस्ताव कृषी विभागामार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या मदत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन पात्र शेतकरी व लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्याची प्रतीक्षा आहे.

यानंतर राज्यातील १९ तालुक्याचा ट्रीगर-२ मध्ये समावेश करण्यात आला होता. आता मात्र राज्य शासनाने ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असून यात गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांचा समावेश केला आहे. ट्रीगर-१ आणि ट्रीगर-२ लागू असलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्यात येणार आहे.

Gondiya News: ३३०२ इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर! प्रदूषण नियंत्रणासाठी ई वाहनांना पसंती; ई-दुचाकींची संख्या सर्वाधिक

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: गोंदिया जिल्ह्यातील किती तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे?

उत्तर: तिरोड्यासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यांचा समावेश झाला आहे.

प्रश्न 2: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळू शकतात?

उत्तर: जमीन महसुलात सूट, पीककर्ज पुनर्गठन किंवा वसुलीबाबत सवलती आणि कृषीपंपांच्या वीजबिलात सूट यांसारख्या उपाययोजना लागू होऊ शकतात. प्रत्यक्ष लाभ संबंधित नियम व पात्रतेनुसार मिळेल.

प्रश्न 3: शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पुढे काय होणार?

उत्तर: पीक नुकसानीचे पंचनामे, प्रस्ताव सादर करणे आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मदतीची वेळ आणि पात्रता याबाबत शासनाच्या पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.

Web Title: Gondia drought relief all eight talukas farmers auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • drought news
  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता
1

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
2

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही
3

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम
4

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.