Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?
आजही भारतात सोप्या आणि सोयीस्कर प्रवासासाठी बाईकपेक्षा स्कूटर जास्त फायदेशीर मानली जाते. म्हणूनच तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्कूटरची विक्री होत असते. सध्या बदलत्या काळानुसार अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या त्यांच्या स्कूटर अपडेट करत आहे. यातही बाईकलाही लाजवेल अशा लूकमध्ये काही स्कूटर लाँच झाले आहेत. असे जरी असले तरी एका स्कूटरच्या मागणीत कधीच घट होत नाही. ती स्कूटर म्हणजे होंडा ॲक्टिव्हा.
दररोजच्या प्रवासासाठी स्वस्त, बेस्ट आणि स्टायलिश स्कूटर म्हणून होंडा अॅक्टिव्हाकडे पहिले जाते. ही स्कूटर तिच्या उत्तम परफॉर्मन्स आणि किफायतशीर मायलेजसाठी ओळखली जाते. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती पूर्ण पैसे देऊन खरेदी करणे गरजेचे नाही. तुम्ही त्यासाठी लोन देखील घेऊ शकता. चला या स्कूटरची ऑन-रोड किंमत आणि EMI प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
राजधानी दिल्लीत होंडा अॅक्टिव्हा 110 स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 95 हजार रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये एक्स-शोरूम तसेच आरटीओ शुल्क आणि विमा रक्कम समाविष्ट आहे. ही किंमत व्हेरिएंट आणि डीलरशिपनुसार देखील बदलू शकते.
होंडा अॅक्टिवा 110 खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 5 हजार रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि उर्वरित रकमेसाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे, जर तुम्हाला ९ टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी लोन मिळाले तर तुम्हाला दरमहा किमान 3 हजार रुपयांचा EMI द्यावा लागेल.
Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
होंडा अॅक्टिव्हा 110 ला Activa 6G असेही म्हणतात, ही स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 109.51 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 7.8 बीएचपी पॉवर आणि 9.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. मायलेजच्या बाबतीत, ही स्कूटर प्रति लिटर 55 किलोमीटरचा दावा करते.
यात 5.3 लिटरचे फ्युएल टॅंक आहे. या स्कूटरचा दावा केलेला मायलेज सुमारे 60 किलोमीटर प्रति लिटर आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, अॅक्टिव्हा 110 मध्ये 4.2 -इंचाचा टीएफटी डिजिटल डिस्प्ले आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनला सपोर्ट करतो. याशिवाय, त्यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि होंडा रोडसिंक ॲपद्वारे कॉल आणि एसएमएस अलर्ट सारखे स्मार्ट फीचर्स आहेत.