फोटो सौजन्य: @AarizRizvi (X.com)
भारतात एसयूव्ही कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये हाय परफॉर्मन्स एसयूव्ही ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे महिंद्रा. नुकतेच कंपनीने 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या 4 एसयूव्ही कॉन्सेप्ट मुंबईत सादर केल्या होत्या. यासोबतच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये जबरदस्त फ्यूचरिस्टिक लूक असणाऱ्या दोन एसयूव्ही कंपनीने लाँच केल्या आहेत. ग्राहक सुद्धा महिंद्राच्या एसयूव्हींना चांगला प्रतिसाद देत आहे.
महिंद्रा XUV700 ही भारतातील लोकांची आवडती SUV बनली आहे. ही कार ऑगस्ट 2021 मध्ये लाँच झाली आणि काही वर्षांतच 3 लाखांहून अधिक कुटुंबांनी ही कार खरेदी केली आहे. याचे मजबूत डिझाइन, उत्तम फीचर्स आणि योग्य किंमत यामुळे ही कार खास बनते. यामुळेच XUV700 कंपनीच्या सर्वात यशस्वी कारमध्ये समाविष्ट आहे.
Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
महिंद्रा XUV700 ची सुरुवातीची किंमत 14.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर याचा टॉप व्हेरिएंट 25.14 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने ही एसयूव्ही 5 आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये सादर केली आहे, ज्यामुळे ती लहान आणि मोठ्या कुटुंबांसाठी एक चांगला पर्याय बनली आहे.
XUV700 दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पहिले 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 197 बीएचपी पॉवर आणि 380 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरे 2.2L एमहॉक डिझेल इंजिन आहे, जे 182 बीएचपी पॉवर आणि 420 एनएम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायासह येतात. त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) फीचर देखील उपलब्ध आहे.
या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोल व्हेरिएंट शहरात 8.5 kmpl आणि हायवेवर 11 किमी प्रति लिटर मायलेज देतो. त्याच वेळी, डिझेल व्हेरिएंट शहरात 13.5 kmpl आणि हायवेवर 16.5-18.5 kmpl इंधन कार्यक्षमता देतो.
आकर्षक डिझाइन, उत्तम वैशिष्ट्ये, सुरक्षितता आणि परवडणारी किंमत यामुळे XUV700 ने भारतीय बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जर तुम्ही १५-२० लाख रुपयांच्या बजेटमध्ये कुटुंबासाठी अनुकूल, शक्तिशाली आणि किफायतशीर SUV शोधत असाल, तर Mahindra XUV700 तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्याय असू शकते.