Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती
किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी जुनसू चो म्हणाले, “कॅरेन्स क्लॅव्हिस आणि क्लॅव्हिस ईव्हीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही मागणी आमच्या उत्पादनातील नाविन्यता, सुरक्षितता आणि आरामदायीपणावर ग्राहकांचा विश्वास दाखवते. दोन्ही ICE आणि EV मॉडेल्स भारतात नवीन बेंचमार्क निर्माण करत आहेत.”
महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
लाँचनंतर अल्पावधीतच क्लॅव्हिससाठी २०,००० हून अधिक आणि क्लॅव्हिस ईव्हीसाठी १,००० हून अधिक बुकिंगची नोंद झाली आहे. SUV ची ताकद, MPV चा आराम आणि फॅमिली कारची वैविध्यता या तिन्हींचा उत्तम कॉम्बिनेशन असलेली कॅरेन्स क्लॅव्हिस विशेषतः भारतीय कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. दुसऱ्या रांगेतील स्लायडिंग-रिक्लायनिंग सीट्स, वन-टच इलेक्ट्रिक टम्बल सीट्स आणि तिसऱ्या रांगेत प्रवेशासाठी सोयीस्कर बोस मोड या फीचर्समुळे ही कार लांबच्या प्रवासात तसेच शहरातील दैनंदिन वापरात उपयुक्त ठरते.
प्रीमियम केबिनमध्ये ड्युअल पॅनोरॅमिक १२.३-इंच डिस्प्ले, बोस ८-स्पीकर सिस्टम, ६४-कलर ॲम्बियंट लाईटिंग, ड्युअल डॅशकॅम आणि प्रगत इन्फोटेनमेंट स्वॅप-स्विच या तंत्रज्ञानामुळे चालक आणि प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध होतो.
कियाची पहिली मेड-इन-इंडिया EV – कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही – आधुनिक ईव्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. यात १७१ पीएस मोटर, २५५ एनएम टॉर्क, दोन बॅटरी पर्याय (५१.४ केडब्ल्यूएच – ४९० किमी रेंज व ४२ केडब्ल्यूएच – ४०४ किमी रेंज) देण्यात आले आहेत. १०० केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे ही कार ३९ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होते.
सात-आसनी लेआउट, प्रशस्त इंटिरिअर, ९० कनेक्टेड कार फिचर्स आणि प्रगत ड्रायव्हिंग स्थिरतेमुळे ही EV दररोजच्या प्रवासापासून ते विकेंड ड्राइव्हपर्यंत एक चांगला अनुभव देते.
सुरक्षिततेच्या बाबतीत, कॅरेन्स क्लॅव्हिस श्रेणीत लेव्हल-२ ADAS सह २० पेक्षा जास्त ऑटोनॉमस सुरक्षा वैशिष्ट्ये, तसेच १८ प्रगत पॅसिव्ह सेफ्टी फिचर्स दिले आहेत. सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रिअर ऑक्यूपंट अलर्ट आणि ३६०-डिग्री कॅमेरा मॉनिटरमुळे कुटुंबाचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो.
कॅरेन्स क्लॅव्हिस आयसीई आणि ईव्ही दोन्ही मॉडेल्ससह किया इंडिया भारतीय ग्राहकांना तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि प्रीमियम अनुभव यांचे एकत्रित पॅकेज देत असून, कंपनीचे बाजारपेठेतील नेतृत्त्व अधिक मजबूत करत आहे.






