नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत
असं सांगितलं जात होतं की कंपनी कमी विक्रीमुळे iPhone Air चे प्रोडक्शन पूर्णपणे बंद करणार आहे. मात्र आता असं सांगितलं जात आहे, 2026 मध्ये कंपनी फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 देखील लाँच करू शकते. याचे काही लीक्स देखील समोर आले आहे. त्यामुळे आयफोन 18 सिरीज आणि फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 देखील 2026 मध्ये लाँच केला जाण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपलने यावर्षी त्यांचा सर्वात पातळ आयफोन मॉडेल iPhone Air लाँच केला होता. नवीन डिझाईन आणि स्लिम बॉडी यामुळे हा आयफोन यूजर्सना अतिशय आवडेल अशी कंपनीला आशा होती. मात्र हा आयफोन यंदा फ्लॉप ठरला. कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे यूजर्सनी या आयफोनला प्रतिसाद दिला नाही. सिंग कॅमेरा आणि कमी बॅटरी लाईफ यामुळे हा आयफोन यूजर्सना आवडला नाही. त्यामुळे या आयफोन मॉडेलची विक्री झाली नाही. याच सर्वांचा विचार करून आता कंपनी त्यांचे नवीन मॉडेल अधिक शक्तिशाली बनवण्याचा विचार करत आहे. यामध्ये रियरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत लीक्स देखील समोर आले आहेत. याशिवाय यामधील चिपसेट आणि दूसरे हार्डवेयर देखील अपग्रेड केले जाणार आहे.
काही रिपोर्टनुसार, कंपनी iPhone Air 2 हिट बनवण्यासाठी त्याची किंमत कमी ठेवणार आहे. असं सांगितलं जात आहे की. सध्याच्या मॉडेलपेक्षा (1.19 लाख रुपये) त्याची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. अॅपलला आशा आहे की त्याची वाढलेली वैशिष्ट्ये आणि कमी किंमत व्यापक स्वीकृती मिळवेल.
आयफोन 18 प्रो मॉडेल्स, iPhone Air 2 आणि फोल्डेबल फोन सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तर स्टँडर्ड आयफोन 18 2026 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो.
Ans: Apple ने अधिकृत घोषणा केलेली नाही, पण लीकनुसार 2026 मध्ये किंवा त्यानंतर iPhone Air 2 सादर होऊ शकतो.
Ans: होय. Apple ने USB-C स्वीकारल्यामुळे iPhone Air 2 मध्ये USB-C पोर्ट असण्याची शक्यता जास्त आहे.
Ans:






