तिकीट आरक्षण उपकेंद्र पुणे(फोटो-सोशल मीडिया)
चंद्रकांत कांबळे/पुणे : मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून प्रवाशांच्या सोईसाठी आरक्षणाचे चार उपकेंद्र काढण्यात आले होते.परंतु प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे कॅम्प आणि रविवार पेठ येथील दोन केंद्र बंद पडली आहेत. तर उर्वरित दोन केंद्राला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे विभागाकडून मोबाईलच्या माध्यमातून ‘रेल वन’, ‘आयआरसीटीसी’ अॅपच्या माध्यमातून प्रवासी घरबसल्या तिकीट बुक करत आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो,आणि रांगेत उभ् राहावे लागत नाही.जास्ती जास्त प्रवाशांचा कल ऑनलाईनकडे वाढल्याने दिवसेंदिवस या उपकेंद्रावरी तिकीट बुक करण्याची संख्या कमी होताना दिसत आहे.
डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड येथील उपकेंद्रांच्या कामकाजाचे आर्थिक वर्ष २०२३–२४ आणि २०२४–२५ (नोव्हेंबरपर्यंत) तुलनात्मक आढावा घेतला असता, तिकीट विक्री आणि प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसून येते.शंकरशेठ रोड येथील उपकेंद्रात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २२ हजार २५० तिकीटे कमी काढण्यात आली असून त्यातून सुमारे ४९ हजार प्रवाशांची घट झाली आहे. तर डेक्कन जिमखाना उपकेंद्रात तिकीट संख्येत ४४ हजार ३९४ आणि प्रवाशांमध्ये ८८ हजारांची घट नोंदवण्यात आली आहे.
रेल्वे विभागाकडून ऑनलाईन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ‘रेल वन’ आणि ‘आयआरसीटीसी’ अॅपच्या माध्यमातून प्रवासी घरबसल्या तिकीट बुक करू शकतात. त्यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही, वेळेची बचत होते आणि प्रवाशांना जलद सेवा मिळते. तसेच यामुळे रेल्वे प्रशासनावरील ताणही कमी होत आहे.
रेल्वे आरक्षण उपकेंद्रातून तिकीट काढणारा प्रवासी वर्ग प्रामुख्याने ४५ वर्षांवरील नागरिक, कंपनीत काम करणारे कामगार तसेच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया सहज जमत नाही असे प्रवासी आहेत. या प्रवाशांचे प्रमाण उपकेंद्रांवर अधिक दिसून येते.
रेल्वे विभागाकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करण्याची जलद सुविधा उपलब्ध करूण देण्यात आले आहे. त्यामुळे जास्ती जास्त प्रवाशांचा कल हा ऑनलाईन तिकीट काढण्याकडे असून ऑनलाईन प्रक्रियेमुळे प्रवाशांना रांगेत थांबावे लागत नाही तसेच त्यांचा वेळही वाचतो आणि यामुळे रेल्वे प्रशासनावरील ताणही कमी होत आहे. हेमंत कमार बेहरा, जनसंपर्क अधिकरी,रेल्वे विभाग
आर्थिक वर्ष स्लीर्प्स तिकीट प्रवाशी उत्पन्न
आर्थिक वर्ष स्लीर्प्स तिकीट प्रवाशी उत्पन्न






