World Most Expensive Weapons : जगातील सर्वात महागडी शस्त्रे; अब्जावधींची किंमत अन् विध्वंसक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज
ही अत्याधुनिक शस्त्रेच आता देशाच्या संरक्षणाचा कणा म्हणून ओळखली जातात. राष्ट्रीय संरक्षणासाठी अनेक देशांकडून यामध्ये करोडोंची गुंतवणूक केली जाते. आज आपण जगातील सर्वा महागड्या शस्त्रांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची ताकद विध्वंसक असून किंमत जाणून तुम्हाला धक्काच बसेल. पण या शस्त्रांमुळे देशांची ताकदही वाढते.
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, ट्रायडेंट क्षेपणास्त्र हे जगातील सर्वात महागडे शस्त्र आहे. हे अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन या शस्त्रास्त्र कंपनीने विकसित केले आहे. हे एक अण्वस्त्रवाहक वाहन असून अमेरिकेच्या आण्विक सुरक्षा धोरणाचा भाग म्हणून हे क्षेपणास्त्रक् विकसित करण्यात आले होते. याच्या मदतीने मिसाइल्स समुद्रातील पाणबुड्यांमधून डागता येतात. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला हल्ल्याचा अंदाज लावणेही कठीण जाते. अमेरिकेच्या न्यूक्लियर डिटरेंस पॉलिसीमध्ये या मिसाइलला अत्यंत महत्त्व आहे. याची किमंत ५४५ कोटी ८१ लाख ३७ हजार ३०० आहे.
अहवालानुसार, दुसरे सर्वात मोठे शश्त्रे म्हणजे MOAB बॉम्ब. हा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब आहे. हा बॉम्ब हवेतच मोठा स्फोट घडवू शकतो. याममुळे मोठ्या परिसरात प्रचंड विध्वंस घडतो. २०१७ मध्ये अफगाणिस्तानमध्ये या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. याची किंमत अंदाजे १७०,००० डॉलर्स आहे. भूमिगत बंकर आणि दहशतवादी तळे उद्ध्वस्त करता येतात.
याशिवाय आणखी एक सर्वात शक्तिशाली बॉम्ब म्हणजे B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर आहे. याची किंमत अंदाजे २.१ अब्ज डॉलर असून हे बॉम्बर अण्वस्त्र आणि पारंपारिक शस्त्रे वाहून नेऊ शकते. तसेच हे न थांबता हजारो किलोमीटर उंचीपर्यंत उडू शकते. हे शत्रूच्या विमान रडारला देखील सहज चकवा देऊ शकते.
सध्या आधुनिक युगात अचूकतेला अधिक महत्त्व दिले जाते. यामुळे लेझर-गाइडेड क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात युद्धात वापर केला जातो. ॲडव्हान्स प्रसिजन किल वेपन सिस्टम २ सारखी क्षेपणास्त्रे युद्धात वापरली जातात. ही लेझर क्षेपणास्त्रे अगदी लहान लक्ष्यांना देखील अचूकतेने नष्ट करु शकतात. याची किंमत प्रती युविट २३२१,३८९ आहे. हे अधिक अचूनकेतेने आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवू शकते.
स्टिंगर क्षेपणास्त्र हे हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे,. याच्या मदतीने सैनिकांना गोळीबार करता येतो. हे जमिनीवरुन हवेत हल्ल्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमाने पाडण्यास हे सक्षम आहे. याची किंमत अंदाजे ३.१५ दशलक्ष डॉलर्स आहे.
Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा






