फोटो सौजन्य: iStock
हिवाळा म्हंटलं की अनेकांची पाऊले थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास आतुर होत असतात. हिवाळ्याच्या मोसमात माळशेज घाट, माथेरान आणि महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची लगबग पाहायला मिळते. अनेक बाईक रायडर्स सुद्धा या मोसमात लॉंग राइडचा प्लॅन बनवत असतात. पण अनेकदा कडाक्याच्या थंडीत बाईक चालवताना हेल्मेट जरी घातले असले तरी चेहऱ्याला थंडी वाजत असते.
हिवाळ्यात बाईक चालवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. विशेषतः ज्या दिवशी धुके असते आणि जोरदार वारे असतात. अशा परिस्थितीत, चेहरा पहिला गारठला जातो. याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही वेगाने बाईक चालवता तेव्हा बाईकच्या वेगामुळे खूप जोराचा वारा तुमच्या चेहऱ्यावर आदळतो.
मकरसंक्रांतीच्या दिवशी काय खावे, जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; रहाल कायम निरोगी
हा वारा तुम्हाला बराच काळ त्रास देतो. तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतरही, तुमच्या चेहऱ्यावर थंडावा जाणवतो. त्यामुळे हिवाळ्यात बाईक चालवताना थंडीपासून बचाव करणे खूप महत्वाचे आहे. तसेच या थंड हवेमुळे आपला चेहऱ्यावरील त्वचा फाटू देखील शकते. जर तुम्ही हिवाळ्यात तुमचा चेहरा जपला तर तुम्ही आजारी पडण्यापासूनही वाचू शकता. म्हणूनच आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा रायडींग दरम्यान उबदार ठेऊ शकता.
जर तुम्हाला बाईक चालवताना सर्वात जास्त थंडी कुठे जाणवत असेल तर ते तुमच्या नाकाच्या खाली असलेल्या भागात. तुमच्या नाकात सर्दी झाल्यामुळे तुम्ही आजारी पडता. तुम्हाला शिंकणे आणि खोकला येणे सुरू होते. घराबाहेर पडताना सर्जिकल मास्क सोबत ठेवा. सर्जिकल मास्क दोन वेळा घालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे, एक दुसऱ्याच्या वर. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर थंडी पडणार नाही आणि चेहरा उबदार राहील.
बाईक चालवताना जेव्हा डोळे थंड होतात तेव्हा त्यातून पाणी येऊ लागते. ही थंडी तुम्हाला खूप त्रास देते. म्हणून, हे टाळण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. रायडींग दरम्यान, तुम्ही कोणताही स्टायलिश चष्मा वापरा ज्याची व्हिजिबिलिटी चांगली असेल. असे केल्याने तुम्ही सर्दीपासून स्वतःचा बचाव करू शकाल.
जर तुम्ही कपाळावर पॉलिथिन बांधले तर ते तुम्हाला वरच्या भागात थंडी जाणवण्यापासून वाचवेल. १ किलोची पॉलिथिन पिशवी उलटी करून डोक्यावर घालण्याचा प्रयत्न करा.
पॉलिथिनमधून हवा जात नाही. यामुळे तुम्ही सर्दी टाळू शकता. म्हणून, तुमच्या चेहऱ्यावर पॉलिथिन बांधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या जॅकेटमध्येही या सर्व गोष्टी सहज ठेवू शकता. जेणेकरून जर तुम्हाला रात्री उशिरा परतावे लागले तर तुम्ही या तीन गोष्टी सोबत ठेवाव्यात. यामुळे तुमचे थंडीपासून रक्षण होईल.






