(फोटो सौजन्य-AI एआय)
ह्युंदाई BAYON मध्ये पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि IVT गिअरबॉक्सचे पर्याय मिळणार आहेत. कंपनीने अद्याप इंजिनची क्षमता, पॉवर, टॉर्क आणि मायलेजची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या या SUVच्या परफॉर्मन्सबाबत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. ही SUV 5-सीटर असून ह्युंदाईच्या सध्याच्या SUV लाइनअपमध्ये व्हेन्यूच्या वर आणि क्रेटाच्या खाली स्थान घेईल.
सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
BAYON चे सर्वात चर्चेत असलेले फीचर म्हणजे इन-बिल्ट जनरेटिव्ह AI व्हॉइस असिस्टंट. ह्युंदाईच्या म्हणण्यानुसार, ही प्रणाली कारमधील प्रवाशांना अधिक नैसर्गिक पद्धतीने व्हॉइस कमांडद्वारे संवाद साधण्यास मदत करेल. कनेक्टेड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इन्फोटेनमेंट आणि वाहनातील काही फंक्शन्स नियंत्रित करण्याची सुविधाही अपेक्षित आहे.
सुरक्षेच्या बाबतीत BAYON Global K Enhanced Platform वर आधारित आहे. भारतीय मॉडेलसाठी या प्लॅटफॉर्ममध्ये स्ट्रक्चरल स्ट्रेंथ आणि सेफ्टीवर लक्ष देण्यात आले आहे. 6 एअरबॅग्स स्टँडर्ड मिळतील, तर ADASसह विविध ड्रायव्हर असिस्ट फीचर्सही दिले जाणार आहेत.
ह्युंदाई BAYON चे पहिले डिझाइन स्केच जाहीर! दमदार SUV लूकसह येणार नवी कार; पाहा काय असेल खास
डिझाइनमध्ये H-Edge LED DRLs, स्कल्प्टेड बोनट, जिओमेट्रिक व्हील आर्चेस, रॅप-अराउंड लोअर क्लॅडिंग आणि ब्रिज-स्टाइल रूफ रेल्स दिसतात. कारची लांबी सुमारे 4.2 मीटर असून ती सब-4-मीटर SUVपेक्षा मोठी असेल. केबिनमध्ये लेगरूम, हेडरूम आणि शोल्डर रूम जास्त देण्यावरही कंपनीने भर दिला आहे. त्यामुळे कुटुंबासाठी रोजचा वापर आणि लांब प्रवासासाठी BAYON किती व्यावहारिक ठरते, हे लाँचनंतर स्पष्ट होईल.






