सौजन्य - एआय
रस्त्यांची रुंदी आणि संरेखन, सार्वजनिक सुविधांची जागा तसेच आरक्षणांचे प्रयोजन यांत हे बदल आहेत. सुधारित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिले आहेत. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रस्तावित बदल अंतिम होतील.
या गावांचा झाला आराखडा!
महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दाेन गावे वगळली गेली आहेत. त्यामुळे लोहगाव, मुंढवा-केशवनगर, हडपसर (साडेसतरानळी), उंड्री, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, शिवणे आणि उत्तमनगर या नऊ गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. या गावांचा प्रारूप आराखडा ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध केला गेला. त्यावर हरकती आणि सुचनाही मागविल्या गेल्या हाेत्या.
काय आहेत प्रमुख बदल ?
उंड्रीतील राज्य महामार्गाची प्रस्तावित रुंदी ६० वरून ४५ मीटर करणे
धनोरी-वाघोली रस्त्याची प्रस्तावित रुंदी ३६ वरून २४ मीटर करणे
मुंढवा-केशवनगरमधील काही ३६ मीटरचे रस्ते २४ मीटरचे करण्याचे प्रस्ताव
हडपसर-साडेसतरानळी परिसरात काही २४ मीटरचे रस्ते १८ मीटरचे, तर काही १८ मीटरचे रस्ते १२ मीटरचे करणे
लोहगावमध्ये खेळाचे मैदान, शाळा, महापालिका कार्यालय, पाण्याची टाकी आणि इतर सुविधांच्या आरक्षणांमध्ये बदल सुचविले आहेत.
धायरीत बस डेपोच्या आरक्षणाचा काही भाग ट्रक टर्मिनलसाठी दर्शविला
आंबेगाव बुद्रुकमध्ये खेळाचे मैदान, सांस्कृतिक सभागृह आणि उद्यानांच्या आरक्षणांत बदल सुचविले आहेत.
शिवणे परिसरातील दवाखाना, उद्यान आणि शॉपिंग सेंटरच्या आरक्षणांतही फेरबदल आहेत.
हे सुद्धा वाचा : एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
माहिती संकेतस्थळावर
प्रस्तावित फेरबदलांची सूची आणि नकाशे पुणे महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुढील ३० कामकाजाच्या दिवसांत नगररचना विभागाच्या पुणे शाखेतील नवीन प्रशासकीय इमारतीत तसेच महापालिका आयुक्त कार्यालयात नागरिकांना आराखड्याचे अवलोकन करता येईल.
Ans: नऊ गावांच्या प्रारूप विकास आराखड्यात रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि आरक्षणांसह सुमारे १४३ फेरबदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
Ans: लोहगाव, मुंढवा-केशवनगर, हडपसर-साडेसतरानळी, उंड्री, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, शिवणे आणि उत्तमनगर या नऊ गावांचा समावेश आहे.
Ans: प्रस्तावित फेरबदलांची यादी आणि नकाशे पुणे महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच पुढील ३० कामकाजाच्या दिवसांत संबंधित कार्यालयांमध्ये आराखड्याचे अवलोकन करता येणार आहे.






