फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)
भारतात आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. याच स्वप्नासाठी ते दिवसरात्र झटत असतात. त्यात जर कुटुंब मोठे असेल तर मग 7 सीटर कार खरेदी करण्यासाठी अधिक बचत करावी लागते. अशावेळी अनेक जण लोनच्या साहाय्याने आपली ड्रीम कार खरेदी करतात.
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांनी बेस्ट 7 सीटर कार ऑफर केल्या आहेत. यात मारुती सुझुकी एर्टिगाचे नाव आवर्जून घेतले जाते. जर तुम्ही देखील मारुती एर्टिगा खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि संपूर्ण रक्कम एकाच वेळी खर्च करू इच्छित नसाल, तर Maruti Ertiga CNG चा बेस व्हेरियंट VXi (O) EMI वर कसे खरेदी करू शकता त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती
मारुती सुझुकी एर्टिगा खरेदी करण्यासाठी, तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन आणि उर्वरित रक्कम ईएमआय म्हणून भरू शकता. मारुती एर्टिगा सीएनजी व्हीएक्सआय (ओ) व्हेरियंटची किंमत सुमारे 11 लाख रुपये आहे आणि रजिस्ट्रेशन, इंश्युरन्स आणि इतर चार्ज समाविष्ट केल्यानंतर, ऑन-रोड किंमत सुमारे 12.90 लाख रुपये येते.
जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर उर्वरित 10.90 लाख रुपयांसाठी तुम्हाला कार लोन घ्यावे लागेल. 5 वर्षांच्या कालावधी आणि 9% व्याजदरावर आधारित, तुमचा मासिक EMI सुमारे 23,000 रुपये असेल, ज्यामुळे तुम्हाला 5 वर्षांत एकूण 13.57 लाख रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये सुमारे 2.67 लाख रुपये व्याजाचा समावेश असेल.
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, मारुती एर्टिगा सीएनजीमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे सीएनजी मोडमध्ये 86.63 बीएचपी पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते आणि कंपनीचा दावा आहे की ही कार 26.11 किमी/किलोग्रॅमचा उत्तम मायलेज देते.
आता पेट्रोलचा खर्च विसरा ! फक्त 42,000 रुपयात लाँच झाली ही ई-स्कूटर, आजच करून टाका बुक
फीचर्सच्या बाबतीत, या 7-सीटर कारमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ड्युअल एअरबॅग्ज सारखी फीचर्स आहेत. ही कार Renault Triber आणि Kia Carens शी स्पर्धा करते.
आम्ही तुम्हाला सांगतो की मारुती एर्टिगाची ऑन-रोड किंमत शहर आणि व्हेरियंटनुसार बदलू शकते. तसेच, कर्जाचा व्याजदर आणि ईएमआय तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि बँक पॉलिसीवर अवलंबून असतात, म्हणून कार फायनान्स करण्यापूर्वी, जवळच्या मारुती डीलरशिपकडून संपूर्ण माहिती घ्या.