आता पेट्रोलचा खर्च विसरा ! फक्त 42,000 रुपयात लाँच झाली ही ई-स्कूटर, आजच करून टाका बुक
भारतात आता एकापेक्षा एक अशा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत, ज्या उत्तम रायडींग अनुभवासोबतच बेस्ट रेंज देखील ऑफर करतात. पण आजही भारतीय ग्राहक स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या वाहनांना जास्त प्राधान्य देत असतात. यातच आता एक अशी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच आहे, जिची किंमत फक्त 42000 रुपये आहे.
जर तुम्ही पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त झाला असाल आणि तुम्हाला स्टायलिश, परवडणारी आणि पर्यावरणपूरक स्कूटर हवी असेल, तर Odysse इलेक्ट्रिकची नवीन स्कूटर HyFy तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. मुंबईतील या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने 42,000 (एक्स-शोरूम) किमतीत HyFy लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
HyFy विशेषतः शहरांमध्ये आणि शेवटच्या लास्ट माईल डिलिव्हरी नेटवर्कमधील दैनंदिन प्रवाशांसाठी डिझाइन केलेली आहे. त्याचा कमाल वेग 25 किमी/तास आहे. म्हणजेच ही बाईक आरटीओच्या त्रासापासून देखील मुक्त आहे. त्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 70 ते 89 किलोमीटर धावू शकते.
त्याची मोटर पॉवर 250 वॅट आहे. बॅटरी पर्यायाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 48V किंवा 60V बॅटरी पॅक आहे. त्याची चार्जिंग वेळ 4 ते 8 तास आहे. ही स्कूटर खूप शांतपणे चालते आणि यातून जास्त आवाज येत नाही.
Odysse HyFy मध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही केवळ एक बजेट स्कूटर नाही तर एक स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन बनते. यात चावीशिवाय स्टार्ट आणि स्टार्ट/स्टॉप बटण आहे. यात राईड, रिव्हर्स आणि पार्किंग असे मोड आहेत. त्यात क्रूझ कंट्रोल आहे, जे लांब पल्ल्याच्या प्रवासात मदत करते. याशिवाय, एलईडी डिजिटल मीटर प्रदान करण्यात आला आहे, जिथे ग्राहक सर्व आवश्यक माहिती एका नजरेत पाहू शकतो. त्यात सीटखाली स्टोरेजची सुविधा देखील दिली आहे.
हायफाय 5 आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. हे रॉयल मॅट ब्लू, सिरेमिक सिल्व्हर, ऑरोरा मॅट ब्लॅक, फ्लेअर रेड आणि जेड ग्रीन अशा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
या स्कूटरची विक्री 10 मे 2025 पासून सुरू होईल. ग्राहक देशभरातील त्याच्या डीलरशिप नेटवर्क आणि कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ओडिसी स्कूटर बुक करू शकतात. कंपनी सुरुवातीच्या ग्राहकांना विशेष सवलती आणि अतिरिक्त वॉरंटी बेनिफिट्स देत आहे.