Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघाने’! भारतीय ट्रकवरच्या मजेशीर आणि भावुक शायरींचा प्रवास

ट्रक्सवर लिहलेली शायरी म्हणजे केवळ सजावट नसून, महिनोनमहिने घरापासून दूर राहणाऱ्या कष्टकरी ड्रायव्हर्सच्या भावना, विनोद आणि संस्कृती व्यक्त करणारं जिवंत 'फिरतं साहित्य' आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 18, 2026 | 07:04 PM
‘बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघाने’! भारतीय ट्रकवरच्या मजेशीर आणि भावुक शायरींचा प्रवास
Follow Us
Follow Us:

आपल्याकडील हायवेवरून प्रवास करताना एका गोष्टीकडे लक्ष हमखास जातं—ते म्हणजे ट्रक्सच्या मागे आणि बाजूंना लिहिलेल्या रंगीबेरंगी ‘शायरी’ आणि ‘स्लोगन्स’ यांच्यावर. कधी चेहऱ्यावर हसू आणणारे विनोदी टोमणे, तर कधी थेट काळजाला भिडणारे भावनिक शब्द. हा फक्त ट्रक सजवण्याचा भाग नाही, तर तो रस्त्यावर धावणाऱ्या एका जिवंत, चालत्या फिरत्या साहित्याचा आविष्कारचं आहे असं म्हणायला हवं.

पण कधी विचार केलाय का, की ट्रक ड्रायव्हर्स हे सगळं का लिहितात? या रंजक ओळींमागे त्यांची कोणती मानसिकता आणि भावना लपलेल्या असतात? चला, या फिरत्या साहित्याचा रंजक प्रवास समजून घेऊया.

१.नजरबंदी आणि संरक्षणाची भावना

“बुरी नजर वाले तेरा मुह काला” “बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघाने!”

ट्रक ड्रायव्हर्ससाठी त्यांचा ट्रक हेच त्यांचं घर आणि रोजगाराचं साधन असतं. लाखो रुपयांचे कर्ज काढून किंवा आयुष्यभराची पुंजी लावून ते हा ट्रक घेतात. रस्त्यावरील अपघात, पोलिसांचा ससेमिरा आणि प्रवासातील अनिश्चितता यातून आपल्या ट्रकचं रक्षण व्हावं, ही त्यांची तीव्र इच्छा असते. म्हणूनच, वाईट नजरेपासून वाचण्यासाठी अंधश्रद्धा किंवा लोकभावनेतून अशा ओळी लिहिल्या जातात. यात केवळ भीती नसते, तर एक प्रकारचा आत्मविश्वासही असतो.

२.घरापासून दूर असण्याची रुखरुख

“घर कब आओगे?” “मिस कॉल तर करशील, पण बॅलन्स कुठून आणशील?”

एक ट्रक ड्रायव्हर सण-उत्सव, सुख-दुःख सगळं सोडून महिनोनमहिने घरापासून, आपल्या माणसांपासून दूर असतो. रात्रीच्या शांततेत हायवेवर ट्रक चालवताना त्यांना आपल्या कुटुंबाची, मुलांची आणि पत्नीची तीव्रतेने आठवण येत असते. हीच विरहाची भावना ट्रकच्या पाठीवर शायरीच्या रूपाने उमटते. शब्दांच्या माध्यमातून ते आपल्या मनातील एकटेपणा आणि घराविषयीची ओढ व्यक्त करत असतात.

ट्रकला नवरीसारखं सजवण्याची कला! जाणून घ्या ‘ट्रक आर्ट’च्या कोट्यवधींच्या दुनियेबद्दल

३.‘माझा राजा चालला‘ : छत्रपती शिवरायांबद्दलचा आदर

महाराष्ट्रामधल्या ट्रक्सवर “माझा राजा चालला”, “राजे”, किंवा “जय शिवराय” हे शब्द अत्यंत मानाने लिहिलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज हे ड्रायव्हर्ससाठी केवळ राजे नाहीत, तर ते त्यांचे ऊर्जास्थान आहेत. रात्री-अपरात्री, घाटाच्या अवघड रस्त्यांवरून प्रवास करताना महाराजांचे नाव त्यांना एक वेगळीच हिंमत आणि सुरक्षा देते.

४.जीवनाचे तत्त्वज्ञान आणि विनोद

“मालक धनाचा, मी ताकदीचा!” “हस मत पगले, प्यार हो जायेगा.”

ट्रक ड्रायव्हर्सचे जीवन अत्यंत खडतर असते. पण या खडतर प्रवासातही ते आपला विनोदबुद्धी जिवंत ठेवतात. गाण्यांच्या ओळी, टोमणे आणि आयुष्याचं सोपं तत्त्वज्ञान ते अगदी दोन ओळींत मांडतात. “वेळ आल्यावर नक्कीच परत येईन, सध्या रस्ता तुमचा आहे,” अशा ओळींमधून त्यांची जगण्याची जिद्द आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती दिसून येते.

ट्रकमागच्या ‘हॉर्न ओके प्लीज’ पाटीची खरी कहाणी; दुसऱ्या महायुद्धाशी जोडलेलं क्रेझी कनेक्शन!

ड्रायव्हर्सची मानसिकता- शब्दांतून हलकं होणारं मन

ट्रक चालवणे हे केवळ एक काम नाही, तर ते मानसिक थकवा आणणारं कष्टाचं काम आहे. अनेक तास सलग स्टिअरिंगवर हात ठेवून बसताना येणारा एकटेपणा दूर करण्यासाठी हे ड्रायव्हर्स या साहित्याचा आधार घेतात. भावनांचे प्रकटीकरण या ओळींतून केले जाते. जे ते कोणापाशी बोलू शकत नाहीत, ते ट्रकवर लिहून मोकळे होतात. हायवेवर एका ट्रक ड्रायव्हरने दुसऱ्या ट्रकवरील ओळ वाचली की त्यांच्यात एक मूक संवाद साधला जातो, ज्यामुळे त्यांना आपण एकटे नाही आहोत, अशी जाणीव होते.

त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हायवेवरून जाल आणि एखाद्या ट्रकच्या मागे एखादी रंजक ओळ वाचाल, तेव्हा फक्त हसून सोडू नका. त्या ओळींमागे शेकडो मैल घरापासून दूर राहिलेल्या एका कष्टकरी ड्रायव्हरच्या मनाची धडधड ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण हे ट्रक्स फक्त माल वाहतूक करत नाहीत, तर ते भारतीय संस्कृती, भावना आणि माणसांच्या सुख-दुःखाचे ‘फिरते साहित्य’ पाठीवर वाहून नेतात.

Web Title: Indian truck shayari slogans automobile lifestyle news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • automobile
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
1

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
2

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
3

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
4

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.