फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचा सुवर्ण काळ चालू आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरात कार्स, बाईक्स आणि स्कुटर्सचे झालेले लाँचिंग. अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या अत्याधुनिक वाहने मार्केटमध्ये आणले आहे. इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कुटर्ससोबतच आता जगातील पहिली सीएनजी बाईक सुद्धा बजाज कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. यामुळेच जुलै 2024 मध्ये अनेक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बाईक्स खरेदी केल्या आहेत.
भारतात, Hero पासून TVS पर्यंत अनेक कंपनीज विविध प्रकारच्या बाइक्स ऑफर करतात. जुलै 2024 मध्ये देशातील ग्राहकांनी कोणत्या कंपनीची बाइक सर्वाधिक पसंत केली? टॉप-5 बाईक सेल लिस्टमध्ये कोणत्या बाईक्सचा समावेश करण्यात आला आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
जुलै 2024 च्या अहवालानुसार, Hero Motocorp, Honda Motorcycle, Bajaj Auto, TVS Motors यांसारख्या कंपन्यांच्या बाईक्स जुलै 2024 मध्ये देशभरातील टॉप-5 बाईक विक्रीच्या यादीत समाविष्ट झालाय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात एकूण 6.84 लाखांहून अधिक बाईक्सची विक्री झाली आहे.
हे देखील वाचा: जुलै 2024 मध्ये Electric Two Wheeler ची वाढतेय मागणी, विकल्या गेल्या ‘इतक्या’ दुचाकी
Hero MotoCorp द्वारे स्प्लेंडर ऑफर केली जाते. जुलै 2024 मध्ये या बाईकच्या सर्वाधिक युनिट्सची विक्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या बाईकच्या एकूण 220820 युनिट्सची विक्री झाली आहे.
हिरो स्प्लेंडरनंतर होंडा शाइन विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बाईकचे एकूण 163402 युनिट्सची विक्री झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच जुलै महिन्यात 103072 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली होती.
तिसऱ्या क्रमांकावर बजाजची पल्सर आहे, ज्याची गेल्या महिन्यात एकूण विक्री 95789 इतकी होती. गेल्या वर्षी याच कालावधीत या बाईकची एकूण विक्री 87958 इतकी झाली होती.
विक्रीच्या बाबतीत हिरोची HF Dlx बाईक चौथ्या क्रमांकावर आहे. जुलै 2024 मध्ये या बाईकच्या एकूण 46627 युनिट्सची विक्री झाली. तेच मागच्या वर्षी याच महिन्यात या बाईकचे एकूण 65931 युनिट्स विकले गेले होते. वर्षानुवर्षे या बाईकच्या विक्रीत घट होत असताना देखील ही टॉप-5 मध्ये समाविष्ट आहे.
गेल्या महिन्यात सर्वाधिक मागणी असलेल्या बाईकमध्ये TVS Apache शेवटच्या स्थानावर होती. या TVS बाईकचे एकूण 30681 युनिट्स विकले गेले आहेत. यापूर्वी, जुलै 2023 मध्ये, 22435 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केले आहे.