Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ता सुरक्षेसाठी Kia India चा पुढाकार; सुरू केला ‘या’ उपक्रमाचा दूसरा टप्पा

एमओआरटीएचचे राज्यमंत्री अजय टम्टा यांनी पायाभूत सुविधा व जागरूकता उपक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा बळकट करण्यासाठी किया इंडियाच्या संरचित दृष्टिकोनाचे कौतुक केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 06:00 PM
रस्ता सुरक्षेसाठी Kia India चा पुढाकार; सुरू केला ‘या’ उपक्रमाचा दूसरा टप्पा
Follow Us
Close
Follow Us:

किया इंडियाने सुरू केला ‘बकल अप’ उपक्रमाचा दुसरा टप्पा
नवी दिल्‍लीमधील ट्रान्‍सपोर्ट भवन येथे झाले उद्घाटन
किया इंडियाचे प्रमुख अधिकारी व वरिष्‍ठ सरकारी अधिकारी उपस्थित

मुंबई: जबाबदार गतीशीलता प्रमुख म्‍हणून आपली भूमिका अधिक दृढ करत किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकर कंपनीने रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्‍या (एमओआरटीएच) आश्रयांतर्गत द सोशल लॅब फाऊंडेशन (टीएसएल)सोबत सहयोगाने आपला प्रमुख रस्‍ता सुरक्षा उपक्रम ‘बकल अप’च्‍या लाँचची (Automobile News) घोषणा केली. या पुढील टप्‍प्‍यानिमित्त किया इंडिया आणि टीएसएलने या उपक्रमाची अधिक पोहोच व प्रभावासाठी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. नवी दिल्‍लीमधील ट्रान्‍सपोर्ट भवन येथे एमओआरटीएचचे माननीय राज्‍यमंत्री अजय टम्‍टा यांच्‍या हस्‍ते फेज २ चे उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी वरिष्‍ठ सरकारी अधिकारी आणि किया इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बकल-अप प्रकल्‍पाच्‍या फेज १ दरम्‍यान (फेब्रुवारी २०२४ – फेब्रुवारी २०२६), किया इंडियाने रस्‍ता सुरक्षेसंदर्भात आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी गुरूग्राम वाहतूक पोलिसांसोबत सहयोग केला, जेथे पायाभूत सुविधा आणि वर्तणूकीसंदर्भात जागरूकता यांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. या उपक्रमांतर्गत गुरुग्राममधील ओळखण्‍यात आलेल्‍या अत्‍यंत धोकादायक भागांमध्‍ये ७५० क्रॅश बॅरियर्स बसवण्‍यात आले, ज्‍यासह प्रत्‍यक्ष प्रतिबंधात्‍मक पायाभूत सुविधा प्रबळ करण्‍यात आल्‍या. या प्रयत्‍नांना पूरक म्‍हणून किया इंडियाने १०० शाळांमध्‍ये संरचित रस्‍ता सुरक्षा माहिती उपक्रम राबवले, ज्‍याद्वारे ते जवळपास ३२,००० विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचले आणि रस्‍त्‍यावरील तरूण वापरकर्त्‍यांमध्‍ये लवकर जागरूकता निर्माण करण्‍याला चालना दिली.

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

फेज १ अंतर्गत तरुणांचा सहभाग वाढवत आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने काम करत समुदाय-केंद्रित रस्ता सुरक्षेसाठी विकासात्मक व निष्पत्ती-केंद्रित मॉडेल तयार करण्यात आले. या मजबूत पायावर आधारित फेज २ (एप्रिल २०२६ – मार्च २०२८) मध्ये उपक्रमाचा भौगोलिक विस्तार आणि प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले जाणार आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये १०० कॉलेजमधील सुमारे २०,००० विद्यार्थ्यांना प्रगत ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स व संरचित प्रशिक्षण मॉड्यूल्सद्वारे सहभागी करून सुरक्षित ड्रायव्हिंगविषयी जागरूकता निर्माण केली जाईल. तसेच गुरगाव आणि दिल्ली-उत्तराखंड महामार्गासारख्या उच्च-जोखीम भागांमध्ये अतिरिक्त क्रॅश बॅरियर्स बसवून रस्ता सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येतील.

एमओआरटीएचचे राज्यमंत्री अजय टम्टा यांनी पायाभूत सुविधा व जागरूकता उपक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा बळकट करण्यासाठी किया इंडियाच्या संरचित दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि अपघात कमी करण्यासाठी उद्योग-सरकार सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.किया इंडियाचे प्रतिनिधी सूद यांनी सांगितले की, ‘बकल अप’ उपक्रमाद्वारे सुरक्षित गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्याची कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ होत आहे आणि फेज २ मध्ये तरुण व पहिल्यांदा वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल.

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

टीएसएल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक अपूर्व शर्मा यांनी नमूद केले की, फेज १ मध्ये तयार झालेल्या ऑपरेशनल पायावर आधारित फेज २ मध्ये या उपक्रमाचा विस्तार नवीन भौगोलिक क्षेत्रे व विविध वयोगटांपर्यंत केला जाईल. या उपक्रमाद्वारे किया इंडिया सरकार, स्थानिक प्राधिकरणे आणि समुदाय भागधारकांसोबत सहयोगाने काम करत देशभरात सुरक्षित रस्ता वर्तणूक आणि मजबूत गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्यास हातभार लावत आहे.

Web Title: Kia india launches second phase of buckle up road safety initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • automobile news
  • kia
  • Kia Motors

संबंधित बातम्या

अरे वा मस्तच! अपडेटेड Bajaj Chetak बाजारात; वाढली रेंज आणि टॉप स्पीड, TVS iQube ला कडवी टक्कर
1

अरे वा मस्तच! अपडेटेड Bajaj Chetak बाजारात; वाढली रेंज आणि टॉप स्पीड, TVS iQube ला कडवी टक्कर

Seltos आणि Sierra ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Hyundai Creta; फीचर्समध्ये काय असेल खास?
2

Seltos आणि Sierra ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Hyundai Creta; फीचर्समध्ये काय असेल खास?

Car Cooling Tips: कारमध्ये AC चालवल्याने खिसा होतोय रिकामा? 1 तासात नक्की किती पेट्रोल खर्च होतं? वाचा सविस्तर
3

Car Cooling Tips: कारमध्ये AC चालवल्याने खिसा होतोय रिकामा? 1 तासात नक्की किती पेट्रोल खर्च होतं? वाचा सविस्तर

कमाल! आता बाईकमध्ये मिळणार कारसारखी सुरक्षा, आली 3 पायांची मोटरसायकल; डिटेल्स वाचाच
4

कमाल! आता बाईकमध्ये मिळणार कारसारखी सुरक्षा, आली 3 पायांची मोटरसायकल; डिटेल्स वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.