आळंदीच्या विनर्स अकॅडमीमधील विद्यार्थ्यांच्या दिवेआगर सहलीला गुरुवारी दुर्दैवी वळण मिळालं. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी बुडाल्याची आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सहलीला एकूण ४८ विद्यार्थी आणि शिक्षक गेले होते. यामध्ये २५ विद्यार्थी, १७ विद्यार्थिनी आणि ६ शिक्षकांचा समावेश होता. दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आलं.
दरम्यान, सहलीपूर्वी पालकांकडून संस्थेने अंडरटेकिंग घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या आणि समुद्रात पोहण्यास परवानगी कशी देण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.