Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

आंध्र प्रदेशातील अनंतपूर प्लांटमध्ये एका नव्या अत्याधुनिक फ्लॅगशिप कारची निर्मिती सुरू झाली असून, ती लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. या कारमधील प्रगत हायब्रिड तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचे एआय फीचर्स ग्राहकांचा वाहन चालवण्याचा अनुभव कसा बदलणार, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 20, 2026 | 06:25 PM
Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
Follow Us
Follow Us:
  • अनंतपूर येथील प्लांटमध्ये किआ सोरेंटोचे उत्पादन अधिकृतपणे सुरू झाले असून बुकिंगलाही प्रारंभ झाला आहे.
  • ही प्रीमियम SUV भारतात पेट्रोल-हायब्रिड आणि डिझेल अशा दोन सर्वोत्तम इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध केली जाईल.
  • यात ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टिमसह जगात प्रथमच लाईव्ह जनरेटिव्ह एआय असिस्टंट तंत्रज्ञान मिळणार आहे.

किया इंडियाने आपल्या आगामी फ्लॅगशिप थ्री-रो प्रीमियम SUV ‘किया सोरेंटो’ चे उत्पादन आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील प्लांटमध्ये अधिकृतपणे सुरू केले आहे. ही कार ४ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय बाजारात लाँच होणार असून, लाँचिंगपूर्वीच कंपनीने या कारचे पहिले अधिकृत फोटो जाहीर केले आहेत. तसेच, किआच्या अधिकृत डीलरशिप्स आणि वेबसाइटद्वारे या कारची प्री-बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे.

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

दमदार इंजिन पर्याय आणि ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टिम

ही नवीन प्रीमियम कार पेट्रोल/हायब्रिड आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टिमसह येणारी कियाची ही भारतातील पहिलीच हायब्रिड SUV ठरणार आहे. या कारची निर्मिती भारतातच केली जात असल्याने, ही प्रीमियम SUV ग्राहकांसाठी अत्यंत स्पर्धात्मक आणि आकर्षक किंमतीत बाजारात उतरवली जाण्याची शक्यता आहे. डिझाइनच्या बाबतीत यात कियाचा प्रसिद्ध ‘टायगर नोज’ फ्रंट ग्रिल, वैशिष्ट्यपूर्ण लाईटिंग एलिमेंट्स आणि रुबाबदार प्रोफाईल देण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर पहिल्यांदाच AI असिस्टंट तंत्रज्ञानाचा समावेश

या कारच्या केबिनला अधिक लक्झरी आणि प्रीमियम लुक देण्यात आला असून, यात ‘Live Generative AI’ वर आधारित ‘AI असिस्टंट’ फीचर मिळणार आहे. किआच्या सोरेंटो मॉडेलमध्ये जागतिक स्तरावर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. ही प्रणाली नेहमीच्या व्हॉईस कमांडपेक्षा अधिक प्रगत असून ती चालकाच्या आणि प्रवाशांच्या दैनंदिन प्रश्नांना रिअल-टाईम माहितीसह उत्तरे देण्यास सक्षम आहे.

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

किया इंडियाचे वक्तव्य

उत्पादन सुरू झाल्याच्या प्रसंगी बोलताना किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ‘ग्वांग्गु ली’ म्हणाले की, सोरेंटो ही जागतिक स्तरावर किआच्या SUV नेतृत्वाचे प्रतीक राहिली आहे. अनंतपूर प्लांटमधून पहिली मेड-इन-इंडिया सोरेंटो बाहेर पडणे हा आमच्या प्रीमियम पोर्टफोलिओसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, आणि ही जागतिक दर्जाची कार भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Web Title: Kia sorento hybrid production begins in anantapur ahead of india launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • automobile
  • cars
  • kia

संबंधित बातम्या

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!
1

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

Jawa Yezdi Roadster Red Wolf आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध! फटाफट पाहा आणि झटकन घेऊन टाका
2

Jawa Yezdi Roadster Red Wolf आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध! फटाफट पाहा आणि झटकन घेऊन टाका

Bajaj Pulsar New Bikes: २८ ऑगस्टच्या लाँचिंगपूर्वी न्यू-जनरेशन बजाज पल्सर १२५ आणि पल्सर १५० चा टीझर रिलीज
3

Bajaj Pulsar New Bikes: २८ ऑगस्टच्या लाँचिंगपूर्वी न्यू-जनरेशन बजाज पल्सर १२५ आणि पल्सर १५० चा टीझर रिलीज

होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६
4

होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.