किया इंडिया या देशातील अग्रगण्य मास-प्रीमियम वाहन उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, किया कॅरेन्स फॅमिलीने भारतात एकूण ३ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे.
भारतातील कुटुंबांच्या बदलत्या आकांक्षांनुसार सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत किया कॅरेन्सने किया इंडियाच्या उत्पादन श्रेणीमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. किया ग्राहकांच्या अभिप्रायाशी नेहमीच जोडलेली राहिली आहे. कंपनीने सुरक्षा, तंत्रज्ञान, आराम, सोय आणि डिझाइनमधील अर्थपूर्ण प्रगतीच्या माध्यमातून ग्राहकांचा मालकीहक्क अनुभव सातत्याने सुधारण्यासाठी वास्तविक अनुभवांचा लाभ घेतला आहे. ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्याच्या या विचारसरणीमुळे कॅरेन्स आपल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वपूर्ण ठरली आहे, तसेच, कौटुंबिक गतीशीलता क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.
कॅरेन्सच्या यशाने कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही या दोन उत्पादनांच्या सादरीकरणासह कॅरेन्स लाइनअपच्या विस्ताराचा पाया रचला. ही दोन्ही उत्पादने अधिक प्रीमियम अनुभव आणि भविष्यकालीन दळणवळण उपायांसाठी ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांना प्रतिसाद म्हणून विकसित केली गेली. कॅरेन्स क्लॅव्हिसने उच्च दर्जाचे डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, वर्धित सुरक्षा आणि उत्तम आरामासह प्रीमियम कौटुंबिक गतीशीलतेला नव्या उंचीवर नेले, तर कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीने जागा, वैविध्यत्व किंवा दैनंदिन उपयुक्ततेशी तडजोड न करता भारतातील कुटुंबांसाठी व्यावहारिक आणि सुलभ इलेक्ट्रिक गतीशीलता आणण्याच्या कियाच्या दृष्टीकोनाला अधोरेखित केले. या सातत्यपूर्ण उत्क्रांतीने ३ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वासच संपादन केला, तसेच वाहन उद्योगातूनही व्यापक मान्यता मिळाली आहे.
एका चार्जमध्ये ५२६ किमी रेंज! कियाची नवीन ‘Syros EV’ भारतात दाखल; बुकिंग सुरू.
आज, कॅरेन्स लाइनअप ग्राहकांना पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पावरट्रेनमधून निवड करण्याची स्थिरता प्रदान करते, ज्यामुळे प्रत्येक कुटुंब आपल्या जीवनशैलीला आणि बदलत्या गरजांना सर्वोत्तम अनुकूल असलेले गतीशीलता पर्याय निवडू शकते. सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी व इतर क्षेत्रांमध्ये प्रीमियम तंत्रज्ञानाचा विस्तार आणि नियमित वैशिष्ट्यपूर्ण सुधारणांद्वारे पूरक असलेल्या या अद्वितीय मल्टि-पावरट्रेन धोरणामुळे कॅरेन्स फॅमिलीला आपल्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहणे शक्य झाले आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर सनहॅक पार्क म्हणाले,”कॅरेन्ससाठी ३,००,००० युनिट्सची विक्री गाठण्याचा हा टप्पा या विभागातील तिचे अव्वल स्थान आणि एमपीव्ही क्षेत्रामधील खरी गेमचेंजर म्हणून तिची ओळख अधोरेखित करतो. हे यश आमच्या उत्पादन-केंद्रित धोरणाचा, ग्राहकांच्या गरजांच्या आमच्या अचूक आकलनाचा आणि गुणवत्तेवरील आमच्या अतूट लक्षाचा प्रत्यक्ष परिणाम आहे. हे यश आमचा विश्वास अधिक दृढ करते की, कॅरेन्स आपल्या श्रेणीमधील मापदंड आहे आणि आम्ही आमचा विकासाचा प्रवास वेगवान करत असताना या गतीचा अधिक विस्तार करण्यासाठी उत्सुक आहोत.”
किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
भारतातील कुटुंबांच्या बदलत्या आकांक्षांना प्रतिसाद देत कियाने कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही लाँच केली. कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये एैसपैस जागा, ६ व ७ आसनी अशा दोन्ही पर्यायांसह वैविध्यपूर्ण सीटिंग आणि इलेक्ट्रिक नाविन्यतेचे संयोजन आहे, ज्यामुळे व्यावहारिक ईव्ही पर्यायांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम निवड बनते. २५५ एनएम टॉर्क देणाऱ्या ९९ किलोवॅट आणि १२६ किलोवॅट मोटरद्वारे चालणारी ही वेईकल दैनंदिन प्रवास आणि लांबच्या प्रवासात सुरळीत परफॉर्मन्स देते. यामध्ये ५१.४ केडब्ल्यूएच (४९० किमी रेंज) आणि ४२ केडब्ल्यूएच (४०४ किमी रेंज) ड्युअल बॅटरी पर्याय मिळतात आणि फक्त ३९ मिनिटांत १० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत जलद चार्जिंग होते.
कॅरेन्सच्या विक्री आकडेवारीमधून ग्राहकांची बदलती पसंती दिसून येते. एकूण विक्रीमध्ये पेट्रोल मॉडेल्सचा वाटा ६० टक्के आहे, त्याखालोखाल डिझेल ३० टक्के आणि ईव्ही १० टक्के आहे. क्लॅव्हिस ईव्ही आपल्या विभागात सर्वोत्तम रेंज देत असली तरी कौटुंबिक प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्येही कियाच्या सर्वोत्तम आणि कार्यक्षम पेट्रोल पॉवरट्रेन्सचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला जात आहे.






