फोटो सौजन्य: Freepik
आपली स्वतःची कार घेणे हे प्रेत्येकाचे स्वप्न असते. पण पुढे हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपल्याला समजते की कार घेणे सोपे आहे पण तिची देखभाल करणे कठीण आहे. नवीन कारला पहिली सर्व्हिस ही मोफत असते. पण ती जेव्हा हळूहळू जुनी होऊ लागते, तेव्हा मग त्यातले अनेक पार्टस खराब होऊ लागतात.
कारमधील प्रत्येक पार्ट हा खूप महत्वाचा असतो. त्यातीलच एक पार्ट मध्ये क्लच प्लेट. जर हा पार्ट खराब झाला तर तुमच्या खिश्याला चांगलीच कात्री बसू शकते. पण काही वेळा कारमधील पार्टस खराब होण्यापूर्वी काही खास संकेत देते.
हे देखील वाचा: बाईकचा गिअर बदलताना क्लच अर्धा दाबावा की पूर्ण? जाणून घ्या योग्य पद्धत
कारच्या क्लच प्लेटमध्ये काही बिघाड असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. क्लच प्लेट खराब होण्यापूर्वी कार कोणत्या प्रकारचे संकेत देते, हे आपण या बातमीत जाणून घेऊया.
कार चालवताना पुढे किंवा मागे जाण्यात अडचण येत असेल तर क्लच प्लेट खराब होण्याचा धोका वाढतो. कधी-कधी ही समस्या इतकी गंभीर होते की गाडी जागेवरून हलवणे सुद्धा कठीण होऊन बसते. अशावेळी, कार टोईंग केल्यानंतरच मेकॅनिककडे नेली जाऊ शकते.
कार चालवताना गिअर्स बदलताना जर समस्या उद्भवत असेल तर समजून जावा की हे देखील क्लच प्लेट खराब होण्याचे लक्षण आहे.
हे देखील वाचा: Reliance चं ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले पाऊल? अनिल अंबानींनी दिले संकेत
डोंगराळ भागात कारने प्रवास करत असल्यास, तिला चालवताना जर अडचण येत असली तर तुम्ही पहिले क्लच प्लेट तपासले पाहिजे.
कार चालवताना कमी वेगातही वाहन पुढे नेण्यात अडचण येत असेल, तर क्लच खराब होण्याचा धोका असतो. सामान्यत: क्लच प्लेटमध्ये काही बिघाड असल्यास कमी स्पीडमध्ये कार जास्त गिअरमध्ये टाकून स्पीड वाढवण्यात अडचण येते.
जेव्हा कधी कारमधील क्लच प्लेट खराब होते, तेव्हा कधी-कधी केबिनमधून दुर्गंधी येऊ लागते. जेव्हा क्लच प्लेट जास्त गरम होते तेव्हा अशी स्तिथी उद्भवते. यामुळे ते खराब देखील होऊ शकते.