सगळीकडे फक्त काश्मीर काश्मीर म्हणता... टीम इंडियाच्या हस्तांदोलन न करण्यावर गोंधळ का? पाकिस्तानी एक्सपर्टने केले भारताचे खूप कौतुक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
IND vs PAK आशिया कप 2025 सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
पाकिस्तानी पत्रकारांनी आपल्या नेत्यांनाच टोमणे मारले
पाकिस्तानी तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंवर टीका
IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मधील भारत–पाकिस्तान सामन्याने राजकीय आणि क्रिकेटीय पातळीवर मोठा वाद निर्माण केला आहे. मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला. परंतु त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये परतले. या कृतीने पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त झाला, पण त्याचवेळी काही तज्ज्ञांनी घरच्या राजकारणालाच जबाबदार ठरवले.
पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी पाकिस्तानी नेत्यांवरच निशाणा साधला. त्यांनी एका चर्चासत्रात स्पष्ट शब्दांत सांगितले – “जगभर कुठेही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचे नेते गेले, की ते लगेच काश्मीर-काश्मीर म्हणायला लागतात. खेळाडूंच्या वागण्यावर आरोप करण्याऐवजी सरकारनेही ठामपणे भूमिका मांडावी. जर भारतीय संघाचे हस्तांदोलन न करणे चुकीचे असेल तर पाकिस्तानने जाहीर करावे की आम्ही पुढचा सामना खेळणार नाही.” त्यांनी पुढे टोमणा मारला की “पाकिस्तानला भारतीय सैन्याने पराभूत केलेला आहे, तरीही आम्ही त्यांच्या संघासोबत क्रिकेट खेळत आहोत. हे विरोधाभासच नाही का?”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले
या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्यावर थेट टीका केली. “शाहिद आफ्रिदी आणि इतर माजी खेळाडूंनी सुरुवातीपासून राजकीय वक्तव्ये केली नसती तर वातावरण एवढे दूषित झाले नसते. क्रिकेट खेळाडूंचे काम खेळाला जोडणे असते, वेगळे करणे नाही. पण दुर्दैवाने आमच्या काही दिग्गजांनी खेळापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले.” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, दोन्ही देशांमधील नाते सुधारल्याशिवाय भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळूच नये होते. “त्यांच्यावर कोणता दबाव होता की त्यांना सामना खेळावा लागला हे मला समजले नाही,” असेही त्यांनी मत व्यक्त केले.
Afridi crying that cricket shud be kept separate than politics
He shud see his own statements spewing venom against India pic.twitter.com/TyrmkemkQ5
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) July 21, 2025
credit : social media
चर्चेत पुढे आणखी गंभीर विधान करण्यात आले “पाकिस्तान क्रिकेटला देशभक्तीपेक्षा पैसा महत्त्वाचा आहे. आम्ही पैशाकडेच पाहतो, म्हणूनच भारताने आमच्यावर हल्ले केले तरी आम्ही सामने खेळायला तयार होतो. हे पाकिस्तानच्या नेतृत्वाचे मोठे अपयश आहे.” यामध्ये त्यांनी मसूद अझहरच्या उदाहरणाने सरकारवरच प्रहार केला “११ ठिकाणी भारताने हल्ला केला, तरी मसूद अझहर आजही जिवंत आहे. अशा परिस्थितीत तरी पाकिस्तानने स्पष्ट सांगायला हवे होते की आम्ही भारताविरुद्ध खेळणार नाही.”
या चर्चेत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख झाला. कमर चीमा म्हणाले “खेळ आणि दहशतवाद वेगळा करता येत नाही. भारतीय संघाने सामना खेळण्याऐवजी थेट बहिष्कार टाकला असता तर पाकिस्तानला स्पष्ट संदेश गेला असता. सामना खेळून त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तीव्रता कमी केली आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : USA China Deal: ट्रम्प यांनी शेवटच्या क्षणी ‘ड्रॅगन’ सोबत केला ‘खास करार’; टॅरिफ डेडलाईनपूर्वीच अमेरिका-चीन संगनमत
#INDvsPAK#AsiaCup2025 #AsiaCupT20
Cricket’s not a battlefield! Indian captain’s war remarks breach ICC rules (Article 2.1.1).
Politicizing the game & fuelling regional tensions is unacceptable.
Let’s keep cricket apolitical & respectful #CricketForSportsNotPolitics #Cricket pic.twitter.com/SaFxVro1G3— 𝐻𝑎𝑚𝑑𝑎𝑛 𝐴ℎ𝑚𝑒𝑑 (@Fallacious_1) September 14, 2025
credit : social media
भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, यावरून स्पष्ट होते की संघाची भूमिका ठाम होती. सरकार व सुरक्षा दलांनी जे सांगितले त्याचे प्रतिबिंब मैदानावरही दिसले. भारतीय संघाला या कृतीसाठी काही प्रमाणात टीका झाली, पण बहुतांश प्रेक्षकांनी ती योग्य ठरवली. या संपूर्ण वादातून हे स्पष्ट होते की भारत–पाकिस्तान क्रिकेट हे केवळ खेळ राहिलेले नाही. ते आता राजकारण, सुरक्षा आणि जनमताशी घट्टपणे जोडले गेले आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी आपल्या नेत्यांनाच प्रश्न विचारल्याने एक वेगळीच हवा निर्माण झाली आहे. क्रिकेटच्या पलीकडचा हा संघर्ष अजून किती पुढे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.