Reliance चं ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले पाऊल? अनिल अंबानींनी दिले संकेत
भारत अनेक कार उत्पादक कंपनीज आहेत, ज्या आपल्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. खरंतर भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर एवढे मोठे आहे की अनेक बाहेरच्या ऑटोमोबाईल कंपनीज सुद्धा या मार्केटमध्ये आपल्या कारसह एन्ट्री मारत असतात. पण आता लवकरच एक भारतीय कंपनी जी कधीच ऑटोमोबाईल क्षेत्राचा भाग नव्हती ती आता या क्षेत्रात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा होत आहे. या कंपनीचे नाव आहे रिलायन्स.
जेव्हा आपण भारतीय ऑटोमोबाईलबद्दल बोलतो तेव्हा टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनींची नावे आपल्या मनात पहिली येतात. आता या यादीत रिलायन्सच्या नावाचा सुद्धा समावेश होऊ शकतो.
हे देखील वाचा: Apple iPhone 16 Pro Max च्या किंमतीत येईल ‘या’ 5 दमदार बाईक्स
भारतातील मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर देशात इलेक्ट्रिक कार आणि त्यांची बॅटरी बनवण्याचा विचार करत आहे. एका रिपोर्टनुसार, यासाठी चिनी कार उत्पादक कंपनी BYD च्या माजी भारतीय कार्यकारी अधिकाऱ्याचाही कंपनीत समावेश करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: ‘या’ दमदार बाईकच्या किंमतीत झाली तब्बल 10 हजारांची घट, आजच करा बुक
यासोबतच ईव्ही प्लांटची किंमत ठरवण्यासाठी कंपनीमध्ये बाह्य सल्लागारांचाही समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, कंपनीने असा प्लांट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यामध्ये एका वर्षात सुमारे 2,50,000 वाहनांना तयार करता येतील. यासोबतच रिलायन्सला आगामी काळात हे लक्ष्य 7,50,000 पर्यंत घेऊन जायचे आहे. कार्सच्या उत्पादनासोबतच रिलायन्सला एक बॅटरी प्लांटही उभारायचा आहे, ज्याची क्षमता 10 गिगावॅट-तास (GWh) एवढी असेल.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी यांची ख्याती आहे. यांचेचं धाकटे भाऊ अनिल अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. 2005 मध्ये दोन्ही भावांनी आपापले व्यवसाय वेगळे केले. माहितीनुसार, मुकेश अंबानींची कंपनी देखील बॅटरीच्या निर्मितीवर काम करत आहे आणि आता अनिल अंबानींनी कारसोबत बॅटरीचे उत्पादनही सुरू करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत दोन्ही भाऊ समोरासमोर दिसू शकतात.