फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक नवीन आणि अत्याधुनिक कार्स लाँच झाल्या आहेत. यात इलेक्ट्रिक कार्सची संख्या सुद्धा विशेष आहे. परंतु, आजही अनेक ग्राहक इंधनावर चालणाऱ्या कार्सला प्राधान्य देत आहेत. म्हणूनच अनेक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार्ससोबतच इंधनावर चालणाऱ्या कार्सवर सुद्धा भर देत आहे.
भारतात अनेक ऑटो कंपनीज आहेत, ज्या मार्केटमध्ये दर्जेदार कार्स लाँच करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे स्कोडा. स्कोडा देशात अनेक वर्षांपासून दर्जेदार कार्स ऑफर करत आहे. अनेक सेलिब्रेटीज सुद्धा या कंपनीच्या कार्सचा समावेश त्यांच्या कार कलेक्शनमध्ये करत असतात.
मागच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये Skoda Kylaq लाँच झाली होती. आता डिसेंबरपासून या कारची बुकिंग चालू झाले आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे आणि आता ग्राहक स्कोडाच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊन ही कार बुक करू शकतात.
फक्त 7.89 लाखात लाँच झाली Skoda ची जबरदस्त एसयूव्ही, ॲडव्हान्स फिचर्ससह मिळणार सुरक्षेची हमी
या नवीन कारची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आगामी 2025 भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.ही कार 17-इंच अलॉय व्हीलसह येते. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
नवीन Skoda Kylaq च्या इंटिरिअरबद्दल सांगायचे झाले तर ते अनेक दमदार फीचर्स या कारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्या प्रमुख फीचर्समध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि 6-स्पीकर कँटन साउंड सिस्टीम यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
ग्राहकांच्या सेफ्टीवर सुद्धा कंपनीने विशेष लक्ष दिले आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर ही SUV अनेक उत्तम सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे. या कारच्या सर्व व्हेरियंट 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल प्रोग्राम आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट यांसारख्या फीचर्ससह येतात.
फक्त 500 रुपयात बुक करू शकता OLA ची नवीन स्कूटर, किंमत आयफोन पेक्षाही कमी
Skoda Auto India ने या नवीन कॉम्पॅक्ट SUV सह 1.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन प्रदान केले आहे. हे इंजिन 114 bhp पॉवर आणि 178 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यासह, ग्राहक 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची निवड करू शकतात.
तब्बल 10 वर्षांनंतर स्कोडा कंपनीने 10 लाख रुपयांच्या आतील कार लाँच केली आहे, जी कंपनीसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. भारतात त्याची स्पर्धा Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra यांसारख्या कारशी असणार आहे