Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या

महाराष्ट्रातील गावोगावी शेताच्या बांधावर दिसणारा शेंदूर लावलेला दगड म्हणजे म्हसोबा देव! पण या ग्रामदैवताची पूजा शेतातच का केली जाते? म्हसोबाचा महादेवाशी काय संबंध आहे आणि भोसले राजघराण्यातही त्यांची उपासना का केली जायची? जाणून घ्या या प्राचीन लोकपरंपरेमागील रंजक कथा.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 12, 2026 | 08:57 PM
म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • म्हसोबा हा शेती, गुरेढोरे आणि गावाचे रक्षण करणारा क्षेत्रपाल देव म्हणून ग्रामीण भागात पूजला जातो. 
  • पुरंदर किल्ल्यावरील म्हसोबा देवस्थान आणि म्हसोबा टाकी या श्रद्धेच्या ऐतिहासिक परंपरेची आठवण करून देतात.       
  • म्हसोबा उपासनेत शेंदूर, धूप, नवस, पालखी आणि यात्रा यांसारख्या स्थानिक लोकपरंपरांना विशेष महत्त्व आहे.
तुम्ही जर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून असाल तर ‘म्हसोबा, तुम्हाला नक्कीच परिचयाचा असेल. हा म्हसोबा देव जो गावखेड्यामध्ये, शेतांच्या बांधांवर वसलेला असतो. फार मोठं मंदिर नसलं तरी छोटस देऊळ म्हसोबाच नक्कीच असतं. चला या राखणदार म्हसोबाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

कसा दिसतो म्हसोबा?

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक,तमिळनाडू, आंध्रप्रदेश या भागांतही हा क्षेत्रपाल देव आवर्जून आढळतो. दक्षिण भारताच्या या काही भागांत याला वेगळ्या नावानेही ओळखले जाते. इतर देवळांतल्या देवांपेक्षा जरा वेगळा, जरा ओबडधोबड दगडावर लाल-केशरी शेंदूर फासलेल्या या म्हसोबाचा इतिहास शिवरायांच्या काळातही नोंद केला गेला होता. म्हसोबा या शब्दाची फोड पहिली तर ती महिष आणि बा अशी होते. थोडक्यात काय तर म्हशी,गायी म्हणजे गुरेढोरे-शेतीवाडी याचे बापई, वडिलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे राखण करणारा क्षेत्रपाल देव म्हणजे म्हसोबा. होय, म्हणूनच म्हसोबच देऊळ दूर शेताच्या बांधावर असतं.

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा

म्हसोबाची ऐतिहासिक नोंद आणि शेतीकामांची सांगड

ऑक्सफर्ड विद्यापीठतल्या प्राध्यापिका रोझालिंड ओ’हॅनलन यांच्या मते, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात म्हसोबा देवाची पारंपरिक उपासना मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. 19व्या शतकातील मराठा समाजाच्या श्रद्धेचे वर्णन करताना त्या असे सांगतात की, गावाच्या परिसरात म्हसोबाच्या नावाने एखादा दगड स्थापित करणे, त्याला शेंदूर लावणे आणि धूप अर्पण करणे, ही अनेक कुटुंबांमधील परंपरा होती. शेतीची काम सुरू करताना पेरणीसाठी बियाणे घेणे, शेतात कुळवणी करणे किंवा मळणी झालेल्या धान्याचे माप घेणे, अशा महत्त्वाच्या प्रसंगी म्हसोबाचे नाव घेण्याची प्रथा असल्याचही त्या नमूद करतात. गाववाड्याच रक्षण करणारा, गुरं म्हसरांवर लक्ष ठेवणारा, शेती चांगली पिकण्यासाठी आशीर्वाद देणारा म्हणून या म्हसोबाच्या उपासनेची मान्यता आपल्याकडे आहे.

भोसले राजघराण्यातही केली जायची म्हसोबाची उपासना

म्हसोबा देवाची उपासना भोसले घराण्यातही केली जात असल्याचे उल्लेख आढळतात. पुरंदर किल्ल्यावर म्हसोबाचे एक देवस्थान असून, जवळच असलेल्या जलसाठ्याला ‘म्हसोबा टाकी’ असेही नाव आहे. म्हसोबाची देवस्थानेप्रामुख्याने लोकपरंपरेशी संबंधित असून, त्यांचा संस्कृत धार्मिक साहित्यात विशेष उल्लेख आढळत नाही. त्यांना शेतीचे आणि जमिनीचे रक्षण करणारे ‘क्षेत्रपाल’ दैवत मानले जाते. काही लोकश्रद्धांनुसार, म्हसोबा हे सप्तनदीदेवतांच्या म्हणजेच ‘साती आसरा’ यांच्या रक्षक भावाच्या रूपातही पूजले जातात.

देवी सप्तशृंगीला अर्धशक्तीपीठ का मानले जाते? सप्तशृंगी देवीची मूर्ती एका बाजूला झुकलेली का आहे? जाणून घ्या

महादेवाचा अवतार आणि लोकश्रद्धा

काही लोकपरंपरामध्ये मानले जाते कि म्हसोबा श्री शंकरांचा अवतार आहेत. ‘महिष’ किंवा ‘महेश’ या नावांशी त्यांची सांगड केली जाते. महाराष्ट्रातील म्हसोबाच्या उपासनेत त्यांच्या पत्नी जोगुबाईचीही पूजा केली जाते; काही परंपरांमध्ये जोगुबाईचा संबंध दुर्गादेवीशी जोडला जातो. काही ठिकाणी ही म्हसोबाची देवळ गावाबाहेर किंवा स्मशानभूमीच्या परिसरातही असतात. लोकश्रद्धेनुसार म्हसोबा दुष्ट शक्तींपासून संरक्षण करणारा देव माना जातो.

विविध समाजातील म्हसोबासाठीच्या लोकप्रथा

प्रकर्षाने धनगर, मांग, चांभार, या आणि इतर समुदायांच्या धार्मिक परंपरांमध्ये म्हसोबाला महत्त्वाचे स्थान आहे. काही बऱ्याच ठिकाणी म्हसोबाला नवसपूर्तीसाठी बोकडाचा बळी देण्याची प्रथा आढळते. काही ठिकाणी फक्त श्रीफळनारळ वाढवला जातो. म्हसोबा यात्रेदरम्यान पालखीतून देवाची मिरवणूक काढली जाते आणि भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. अशा प्रकारे म्हसोबाची उपासना ही महाराष्ट्रातील ग्रामदैवतांची परंपरा, शेतीशी निगडित श्रद्धा आणि स्थानिक लोकसंस्कृती यांचा महत्त्वाचा भाग आहे.

Web Title: Mhasoba god story maharashtra farm boundary village guardian ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 08:55 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Religion

संबंधित बातम्या

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा
1

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा
2

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक आहे का? ओटी कधी भरावी, पूजा कशी करावी?
3

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक आहे का? ओटी कधी भरावी, पूजा कशी करावी?

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
4

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.