फोटो सौजन्य: @MahindraBolero (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यातही सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटी देखील आपल्या कार कलेक्शनमध्ये एसयूव्हीचा समावेश करत असतात. यासोबतच सामान्य नागरिकांचा कल देखील एसयूव्ही कार्सकडे असतो. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच होत आहे.
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या आपल्या दमदार एसयूव्हीमुळे ओळखल्या जातात. त्यातीलच एक कंपनी म्हणजे महिंद्रा. कंपनीने अलीकडेच भारतात Mahindra Bolero Neo Bold Edition लाँच केले आहे. हे पूर्वीसारखेच 1.5-लिटर, तीन-सिलेंडर डिझेल इंजिन वापरते, जे 98BHP पॉवर जनरेट करते. त्यात किरकोळ कॉस्मेटिक बदल आणि नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. चला या एसयूव्हीच्या बेस्ट फीचर्सबदल जाणून घेऊयात.
MG Windsor EV Pro चा नवा व्हेरियंट Exclusive Pro झाला लाँच,मिळेल अजूनच धमाकेदार फीचर्स
अलीकडेच, महिंद्राने XUV700 इबोनी एडिशनला नेपोली ब्लॅक एक्स्टर्नल रंग दिला. आता कंपनीने बोलेरो निओलाही या रंगाने रंगवले आहे, ज्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत आहे.
बोल्ड एडिशनमध्ये बोलेरो निओचे एक्सटेर्नल पार्टस काळे केले आहेत. या काळ्या रंगाचा वापर त्याच्या फॅसियाच्या क्रोमला गडद करण्यासाठी केला गेला आहे. ज्यामुळे ही एसयूव्ही खूपच आकर्षक दिसते.
बोलेरो निओ बोल्ड एडिशनमध्ये रूफ रेल देखील दिले आहेत. या रूफवरील रेलमुळे या एसयूव्हीला अधिक स्पोर्टी लूक मिळतो. त्यामुळे त्याची स्पोर्टिनेसही वाढते.
महिंद्रा बोलेरो निओ बोल्ड एडिशन पूर्णपणे काळ्या थीमसह ऑफर केली आहे. त्याच्या सीटवर ब्लॅक नेक पिलो आणि कुशाण देनाय्त आले आली आहे. त्यात काळ्या लेदरेट सीट्स आहेत. एसयूव्हीच्या आतील भागात उपलब्ध असलेल्या या फीचर्समुळे, ही कार खूप आरामदायी देखील आहे.
२०२५च्या या वाढत्या उन्हात घ्या गाडीची विशेष काळजी; Follow करा काही टिप्स, सुरक्षित ठेवा तुमची कार
महिंद्रा बोलेरो निओ बोल्ड एडिशनमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे मागचा ब्लाइंड स्पॉट पाहणे सोपे होते.
बोलेरो निओमध्ये 1.5-लिटर mHawk डिझेल इंजिन आहे जे 98.5 bhp आणि 260 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.
महिंद्रा बोलेरो निओ भारतात 11.90 लाख ते 12.58 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.