(फोटो सौजन्य-AI एआय)
स्कॉर्पिओ N वर सर्वात मोठा फायदा
स्कॉर्पिओ N च्या Z8L आणि Z8T 4WD ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 1.25 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 25,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज असा एकूण 1.50 लाख रुपयांचा फायदा दिला जात आहे. याच SUV च्या 2WD ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 50,000 रुपये कॅश आणि 25,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा फायदा मिळतो.
थार आणि XUV3XO वरही ऑफर्स
Mahindra Tharच्या प्री-फेसलिफ्ट 4WD पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटवर 50,000 रुपये कॅश आणि 30,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजसह एकूण 80,000 रुपयांचा फायदा आहे. Thar 2WD LXT वर 30,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज मिळतात. तर Mahindra XUV 3XOच्या निवडक पेट्रोल व्हेरिएंटवर 40,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजमुळे 60,000 रुपयांपर्यंत फायदा मिळतो. डिझेल व्हेरिएंटवर 10,000 रुपये कॅश आणि 15,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा फायदा आहे.
स्कॉर्पिओ क्लासिक आणि XUV400 EV देखील यादीत
Mahindra Scorpio Classicच्या S व्हेरिएंटवर 15,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज, तर S11 वर 25,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत. त्यामुळे अनुक्रमे 35,000 आणि 45,000 रुपयांचा फायदा मिळतो. इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 EL Pro वर थेट 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आहे.
महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
याशिवाय Mahindra Bolero आणि Bolero Neo वर एक्सचेंज व कॉर्पोरेट बेनिफिट्स आहेत. BE 6 आणि XEV 9e वर डीलर लेव्हल ऑफर्स मिळू शकतात. विशेष म्हणजे Thar Roxx या फेस्टिव्ह स्कीममध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे SUV खरेदीचा विचार करणाऱ्या कस्टमर्सनी बुकिंगपूर्वी आपल्या शहरातील डीलरकडे ऑफर आणि स्टॉकची ऑफीशली माहिती घेणे फायदेशीर ठरेल.






