फोटो सौजन्य: @AMG133 (X.com)
Mahindra Scorpio N ही भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे, ज्याला नेहमीच तुफान मागणी मिळत असते. 2025 मध्ये, या एसयूव्हीच्या वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी वेटिंग पिरियड आता 1.5 ते 3.5 महिन्यापर्यंत झाला आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एनची लोकप्रियता पाहता, याच्या वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी वेटिंग पिरियड निश्चित करण्यात आला आहे. आता तुम्हाला Z2 व्हेरियंटसाठी 1.5 ते 2 महिने, Z4 व्हेरियंटसाठी 2 ते 2.5 महिने, Z6 साठी 2.5 ते 3 महिने आणि Z8 व्हेरियंटसाठी 3 ते 3.5 महिने वाट पहावी लागू शकते.
कंपनीची प्रोडक्शन कपॅसिटी आणि वाढत्या मागणीमुळे, हा वेटिंग पिरियड आणखी वाढू शकतो. स्कॉर्पिओ एनची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 25.15 लाख रुपयांपर्यंत जाते, जे व्हेरियंट आणि ट्रान्समिशन पर्यायानुसार बदलते.
ही एसयूव्ही दोन इंजिन पर्यायांसह येते – पहिले, 2.0-लिटर एमस्टॅलियन टर्बो-पेट्रोल इंजिन जे 203 पीएस पॉवर आणि 370 एनएम टॉर्क निर्माण करते आणि सुमारे 16.5 ते 18.5 किमी प्रति लिटर मायलेज देते. दुसरे, 2.2-लिटर एमहॉक डिझेल इंजिन आहे, जे बेस ट्रिममध्ये 132 पीएस पॉवर आणि हाय ट्रिममध्ये 175 पीएस पॉवर देते, तसेच 300 ते 400 एनएम टॉर्क जनरेट करते.
एकेकाळी मार्केट गाजवणारी बाईक अनुभवतेय विक्रीत दुष्काळ ! EV मॉडेलमुळे खेळच बिघडला
डिझेल व्हेरियंट 12.12 ते 15.94 किमी प्रति लिटरचा अंदाजे मायलेज देतो आणि 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. याशिवाय, डिझेल मॉडेलमध्ये 4×4 पर्याय देखील आहे, जे या कारला ऑफ-रोडिंगसाठी तयार करते.
Scorpio N टेक्नॉलॉजी आणि आरामदायी फीचर्सनी परिपूर्ण आहे. त्यात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. सोनीची 12-स्पीकर साउंड सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, इलेक्ट्रिक सनरूफ आणि 6-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट यासारख्या फीचर्समुळे ती प्रीमियम एसयूव्ही बनते.
सुरक्षिततेच्या बाबतीतही स्कॉर्पिओ एन मजबूत आहे. ग्लोबल एनसीएपीने या एसयूव्हीला 5-स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग दिले आहे. त्यात 6 एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) सारखी आधुनिक सेफ्टी फीचर्स आहेत.
Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य
साइझ आणि स्पेसबद्दल बोलायचे झाले तर, Scorpio N ची लांबी 4662 मिमी, कर्ब वेट 1885 किलो आणि कमाल वेग 240 किमी/तास आहे. ही एसयूव्ही 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ती मोठ्या कुटुंबासाठी एक उत्तम एसयूव्ही बनते.