फोटो सौजन्य: Gemini
तुमच्या हेल्मेटची एक्सपायरी डेट काय? अपघात होण्यापूर्वीच जाणून घ्या ते बदलण्याची योग्य वेळ!
मॅन्युअल कारमध्ये ड्रायव्हरला स्वतः गिअर बदलावे लागतात आणि त्यासाठी क्लचचा वापर करावा लागतो. या कार साधारणतः स्वस्त असतात आणि त्यांचा मेंटेनन्सही कमी असते. तसेच, कारवर ड्रायव्हरचा पूर्ण कंट्रोल राहतो, ज्यामुळे कार चालवण्याची जी मजा असते ती अनुभवता येते. मात्र, ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलावे लागल्यामुळे त्रास होऊ शकतो.
ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर आपोआप बदलतात, त्यामुळे ड्रायव्हिंग खूप सोपी होते. या कारमध्ये क्लच नसतो, फक्त ब्रेक आणि ॲक्सिलरेटर वापरावे लागतात. विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये या कार अधिक आरामदायक ठरतात आणि नव्या ड्रायव्हरसाठीही योग्य मानल्या जातात. मात्र, या कारची किंमत आणि मेंटेनन्स मॅन्युअल कारपेक्षा जास्त असते.
PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य! अशा संकटात तुम्ही वाहनातील इंधन कसे वाचवाल?
जर तुमचा बजेट कमी असेल, त्यात तुम्हाला जास्त मायलेज आणि ड्रायव्हिंगवर पूर्ण नियंत्रण हवे असेल, तर मॅन्युअल कार हा उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्हाला आरामदायक आणि सोपी ड्रायव्हिंग हवी असेल आणि शहरातील ट्रॅफिकमध्ये थकवा टाळायचा असेल, तर ऑटोमॅटिक कार तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल.






