फोटो सौजन्य: Pinterest
भारतातील आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात, MG कंपनी ‘Windsor EV’ चा समावेश करते. कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, या कारच्या विक्रीचा शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत 65000 रुपयांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख महानगरांचा या वाहनाच्या आजवरच्या एकूण विक्रीमध्ये 30 टक्के वाटा आहे. याउलट, उर्वरित 70 टक्के विक्री ही लहान शहरे आणि गावांमध्ये झाली आहे.
MG Windsor EV मध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, V2L आणि V2V सुविधा उपलब्ध हेत. याशिवाय एंबियंट लाइटिंग, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, 15.6 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, Apple CarPlay, Android Auto, चार स्पीकर्स, चार ट्विटर्स, सबवूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वुडन फिनिश, 604 लिटर बूट स्पेस, LED हेडलाइट्स, LED टेल लाइट्स, कनेक्टेड DRLs, पॉवर्ड टेलगेट, 18 इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना आणि फ्लश डोअर हँडल्स यांसारखे फीचर्स दिले आहेत.
BMW आणि Audi ची धकधक वाढली! Lexus ची इलेक्ट्रिक लक्झरी सेडान कार लाँच, मिळणार 8 वर्षांची वॉरंटी
रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, MG Windsor Pro EV मध्ये 52.9 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 449 किमीपर्यंत चालते. ही बॅटरी किमान 60 kW DC फास्ट चार्जरने 20 ते 80 टक्के फक्त 50 मिनिटांत चार्ज होते. यामध्ये 136 PS पॉवर आणि 200 Nm टॉर्क देणारी मोटर आहे. तसेच, याच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये सुमारे 330 किमी रेंज मिळते.
किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास, MG Windsor EV ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 14 लाख रुपयांपासून 18.50 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच, BaaS (Battery as a Service) योजनेअंतर्गत ही कार 9.99 लाख ते 13.57 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.






