फोटो सौजन्य: Gemini
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील सुधारित नियम 54 (अ) नुसार वाहनधारकांना पसंतीचे किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक आगाऊ शुल्क भरून आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी निर्धारित नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो. आरक्षित केलेल्या क्रमांकाची वैधता 180 दिवसांपर्यंत असून, या कालावधीत त्या क्रमांकावर वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.
‘या’ तारखेपासून BMW च्या Cars महागणार! जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार किंमत
वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या खिडकी क्रमांक E-18 येथे अर्ज उपलब्ध आहे. तसेच, मार्गदर्शनासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आरक्षणाची नोंद ‘Vahan-04’ प्रणालीमध्ये केल्यानंतर संबंधित वाहनास आरक्षित क्रमांक देण्यात येतो.
वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
‘MH01FH’ या नवीन मालिकेतील पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत खिडकी क्रमांक E-18 येथे अर्ज आणि शुल्क जमा करावे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याच दिवशी दुपारी 2 वाजता लिलाव पद्धतीने क्रमांक वाटप करण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांच्या वतीने करण्यात आले आहे.






