Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट

इलेक्ट्रिक टू व्हीलर म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर Ola Electric चे नाव समोर येते. मात्र FADA च्या रिपोर्टनुसार कॅलेंडर ईयर 2025 मध्ये ओलाच्या विक्रीत 51 टक्क्यांनी घट झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 11, 2026 | 06:24 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सला चांगली मागणी
  • Ather च्या इलेक्ट्रिक दुचाक्यांना चांगली मागणी
  • Ola Electric ची विक्री डगमगली
भारतात इलेक्ट्रिक स्कूटर म्हंटलं की सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे Ola Electric चे. ओला कंपनीने इलेक्टिक स्कूटरला एका नव्या पातळीवर नेऊन ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांनी इलेक्ट्रिक बाईक देखील मार्केटमध्ये लाँच केली. मात्र, हळहळू इतर ऑटो कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाक्या मार्केटमध्ये आणल्या आणि ग्राहकांचे Ola Electric कडे दुर्लक्ष होऊ लागले. नुकतेच एक सेल्स रिपोर्ट सादर झाला आहे. ज्यात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या सेल्सबद्दल सांगितले आहे.

भारताचा इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजार Calendar Year 2025 मध्ये मजबुतीसह बंद झाला आहे. रिटेल विक्रीच्या आकडेवारीनुसार या कालावधीत एकूण 12.8 लाख युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली, तर Calendar Year 2024 मध्ये ही विक्री 11.49 लाख युनिट्स इतकी होती. म्हणजेच वार्षिक पातळीवर बाजारात 11.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये

TVS आणि Bajaj ठरले बाजाराचे खरे लीडर्स

Calendar Year 2025 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये TVS Motor Company ने आघाडी घेतली. कंपनीने वर्षभरात 2,98,881 युनिट्सची विक्री केली असून, ही विक्री Calendar Year 2024 च्या तुलनेत 35.35% अधिक आहे.

दुसऱ्या क्रमांकावर Bajaj Auto राहिली. Bajaj ने 2,69,847 युनिट्सची विक्री करत 39.34 टक्क्यांची YoY वाढ नोंदवली. TVS आणि Bajaj या दोन्ही कंपन्यांची मजबूत कामगिरी यावरून ग्राहकांचा विश्वास आता अशा ब्रँड्सकडे वळत असल्याचे दिसते, ज्यांचे सर्व्हिस नेटवर्क, प्रोडक्ट रिलायबिलिटी आणि ब्रँड व्हॅल्यू आधीपासूनच भक्कम आहे.

Ather ची दमदार झेप, Ola ला बसला मोठा धक्का

Calendar Year 2025 मध्ये Ather Energy साठी हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वोत्तम वर्षांपैकी एक ठरले. कंपनीने 2,00,797 युनिट्सची विक्री केली असून, ही 58.91 टक्क्यांची YoY वाढ दर्शवते. ही वाढ प्रामुख्याने 450 आणि Rizta रेंजला मिळालेल्या मजबूत मागणीमुळे झाली आहे.

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

मात्र याउलट, Ola Electric साठी 2025 हे वर्ष आव्हानात्मक ठरले. कंपनीची विक्री Calendar Year 2024 मधील 4,07,700 युनिट्सवरून घटून 1,99,318 युनिट्सवर आली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर तब्बल 51.11 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. ही घट वाढती स्पर्धा आणि बदलत्या ग्राहक पसंतीकडे स्पष्टपणे इशारा करते.

स्रोत: हा रिटेल सेल्स डेटा FADA रिसर्चकडून घेण्यात आला आहे. डेटामध्ये तेलंगणा राज्याचा समावेश नाही. वाहन रिटेल डेटा 03.01.26 रोजीचा आहे, जो भारत सरकारच्या MoRTH च्या सहकार्याने 1,459 पैकी 1,401 RTOs मधून मिळवला आहे.

 

Web Title: Ola electric sales decreased by 51 percent in calender year 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • automobile
  • Ola Electric
  • record sales

संबंधित बातम्या

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये
1

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये

या आठवड्यात Tata Punch Facelift लाँच होणार, ‘हा’ असेल महत्वाचा बदल
2

या आठवड्यात Tata Punch Facelift लाँच होणार, ‘हा’ असेल महत्वाचा बदल

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी
3

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री
4

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.