(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतातील कार मार्केटमध्ये फ्युलच्या निवडीबाबत मोठा बदल दिसू लागला आहे. पेट्रोल कारचा एकूण नोंदणीतील वाटा कमी होत असताना सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारचा वाटा वेगाने वाढत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2026 मध्ये पेट्रोल कारचा वाटा 41.27% होता. मागच्या वर्षी याच महिन्यात तो 47.18% होता. म्हणजेच वर्षभरात पेट्रोलचा वाटा 5.91 टक्के पॉइंटने कमी झाला आहे.
इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारची मोठी झेप
सप्टेंबर 2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा नोंदणीतील वाटा 8.45% झाला. सप्टेंबर 2025 मध्ये तो 5.74% होता. म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या वाट्यात 2.71 टक्के पॉइंटची वाढ झाली. हायब्रिड कारच्या वाट्यातही चांगली वाढ नोंदवण्यात आली. मागच्या वर्षी 7.30% असलेला हायब्रिड कारचा वाटा आता 9.44% वर पोहोचला आहे.
CNG आणि LPG वाहनांचाही वाटा वाढला आहे. सप्टेंबर 2025 मधील 22.02% वरून तो सप्टेंबर 2026 मध्ये 23.11% झाला. याउलट डिझेल वाहनांचा वाटा जवळपास स्टेबल राहिला. तो 17.76% वरून 17.74% झाला.
जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या
ऑगस्टमध्ये पेट्रोलला पर्यायी इंधनांची आघाडी
ऑगस्ट 2026 मध्ये सीएनजी, एलपीजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा एकत्रित वाटा 41.95% होता. त्याच महिन्यात पेट्रोलचा वाटा 40.85% नोंदवण्यात आला. म्हणजे या पर्यायी इंधन प्रकारांनी एकत्रितपणे पेट्रोलला मागे टाकले. सप्टेंबरमध्ये दोन्ही गटांमधील अंतर कमी झाले; पर्यायी इंधनांचा एकत्रित वाटा 41% तर पेट्रोलचा 41.27% होता.
कार कंपन्यांच्या रणनीतीतही बदल
वाढती मागणी लक्षात घेऊन वाहन कंपन्या वेगवेगळ्या फ्युल प्रकारांतील मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. मारुती सुझुकीकडे सीएनजी कार आणि स्ट्रॉंग हायब्रिड मॉडेल्स आहेत. टाटा मोटर्स पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा विविध पर्यायांवर काम करत आहे. ह्युंदाई, किया आणि महिंद्रा यांच्याही पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या पॉवरट्रेनचे मॉडेल्स आहेत.
व्हॉल्व्हो EX90 भारतात लाँच! 1.26 कोटी किंमत; मिळणार 625 किमी रेंज आणि जबरदस्त लक्झरी फीचर्स
या आकडेवारीवरून ग्राहकांची पसंती बदलत असल्याचे दिसते. पण पेट्रोल कारची नोंदणी कमी झाली म्हणजे तिची विक्री प्रत्येक महिन्यात घटलीच असे नाही. नोंदणीतील वाटा हा एकूण वाहन नोंदणीच्या तुलनेत मोजला जातो. त्यामुळे पुढील काळात फ्य्लचा खर्च, वाहनांची किंमत, चार्जिंग सुविधा आणि सरकारी धोरणे यांचा कार मार्केटवर मोठा प्रभाव राहू शकतो.






