फोटो सौजन्य: iStock
जेव्हा तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाता, तेव्हा नक्कीच तुम्हाला दोन रांगा दिसतात. एका रांगेत काही जण नॉर्मल पेट्रोल भरत असतात तर दुसऱ्या रांगेत काही जण पॉवर पेट्रोल भरताना दिसतात. खरेतर अनेक जण पॉवर आणि नॉर्मल पेट्रोलमधील फरक माहित नसल्याने गोंधळून जातात. तसेच या पेट्रोलच्या किंमती सुद्धा एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. अशावेळी किंमतीनुसार पेट्रोलच्या दर्जात सुद्धा फरक असेल असा सहज अंदाज काही लोकं लावताना दिसतात. जे काही अंशी खरे सुद्धा आहे.
नवीन वर्षात Kawasaki Bikes वर छप्परफाड डिस्काउंट, शोरुमध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी
पेट्रोल पंपावर गेल्यावर त्याची वेगवेगळी नावे बघायला मिळतील. त्यामुळे कोणते पेट्रोल बरोबर आहे याबाबत तुम्ही गोंधळून जाऊ शकता. पॉवर पेट्रोल व्यतिरिक्त हे पेट्रोल एक्स्ट्रा माईल, हाय स्पीड आणि स्पीड या नावांनीही ओळखले जाते.
नॉर्मल पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल हे प्रीमियम फ्युएल आहे. रेग्युलर आणि पॉवर पेट्रोल या दोन्ही पेट्रोलमधील मोठा फरक म्हणजे तुम्हाला पॉवर पेट्रोलमध्ये उच्च ऑक्टेन लेव्हल पाहायला मिळेल. नियमित पेट्रोलमध्ये ऑक्टेन लेव्हल 87 असते, तर पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेन लेव्हल 91 ते 94 दरम्यान असते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ऑक्टेन म्हणजे काय? चला याबद्दल जाणून घेऊया. असे समजा की ज्या पेट्रोलमध्ये जास्त ऑक्टेन असते ते इंजिन knocking आणि detonating ला कमी करण्यास मदत करते. त्यामुळे इंजिनमधून येणारा आवाज कमी होतो. तसेच वाहनाचे इंजिन पूर्ण क्षमतेने काम करते.
पॉवर पेट्रोलमुळे जरी वाहनाचा परफॉर्मन्स सुधारत असला तरी याची किंमत ही नॉर्मल पेट्रोलपेक्षा महाग असते.