आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महाविकास आघाडीला मोठा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. रिपब्लिकन बहुजन सेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना जाहीर पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच रिपब्लिकन बहुजन सेनेने मनसेला कोणताही पाठिंबा दिलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.