अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय.कायम कर्मचाऱ्यांचा 2025 चा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही तो मिळावा, वेतनबदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, वेतनासोबत इ.पी.एफ., एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे. कपातींचे चेक देय वेतनासोबतच अदा करावेत,कर्मचाऱ्यांना मासिक वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.